जोकोव्हिचची विक्रमी २४व्या ग्रँडस्लॅमला गवसणी

मेदवेदेव्वहर तीन सेटमध्ये केली मात

जोकोव्हिचची विक्रमी २४व्या ग्रँडस्लॅमला गवसणी

सर्बियाच्या नोव्हाक जोकोव्हिचने अमेरिकन ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या अंतिम सामन्यात डॅनिल मेदवेदेव्हचा ६-३, ७-६ (७-५), ६-३ असा पराभव करून रविवारी विक्रमी २४व्या ग्रँडस्लॅम पदकाला गवसणी घातली. तब्बल तीन तास १६ मिनिटे हा सामना रंगला. जोकोव्हिचने आतापर्यंत ग्रँडस्लॅम स्पर्धांच्या अंतिम फेरीत ३६वेळा धडक दिली असून त्यापैकी २४वेळा त्याने पदकावर नाव कोरले आहे. त्याचे हे चौथे अमेरिकन ग्रँडस्लॅम. जोकोविचने एकेरीचे सर्वाधिक ग्रँडस्लॅम जिंकणाऱ्या महान टेनिसपटू मार्गारेट कोर्ट यांच्या विक्रमाचीही बरोबरी केली. तसेच, तो एकेरीतील सर्वाधिक ग्रँडस्लॅम जिंकणारा सर्वांत वयस्कर टेनिसपटूही ठरला. आपली दहावी अमेरिकन ग्रँडस्लॅम खेळणाऱ्या जोकोव्हिचने सुरुवातीपासूनच सामन्यावर पकड मिळवली आणि पहिल्याच सेटमध्ये ३-० अशी आघाडी मिळवली. हीच घोडदौड कायम ठेवत त्याने ४८ मिनिटांतच पहिला सेट खिशात टाकला. २-५वर असताना मेदवेदेव्ह याने ब्रेक पॉइंट जिंकून खेळ जिवंत ठेवला. मात्र मेदवेदेव्हकडून झालेल्या चुका जोकोव्हिचच्या पथ्यावर पडल्या.

दुसऱ्या सेटमध्ये दोन्ही खेळाडूंनी आपली सर्व्हिस राखून ३-३ अशी बरोबरी साधली. त्यानंतर, जोकोव्हिच आणि मेदवेदेव्ह यांच्यात ३१ शॉट्सची जबरदस्त रॅली रंगली. जोकोव्हिचला थकवा जाणवत होता. सेटमध्ये त्याने केलेल्या चार डबल फॉल्ट्सवरून तो त्याच्या शरीरावरील नियंत्रण गमावत असल्याचे दिसून आले.

सेट ५-६ असा असताना त्याने टायब्रेकसाठी एक सेट पॉइंट वाचवला. सन २०२३मध्ये, जोकोव्हिचने २५ टायब्रेक जिंकले होते आणि केवळ पाच गमावले होते. मात्र वयाच्या ३६व्या वर्षीही तो टेनिसविश्वातील सर्वोत्तम खेळाडू का आहे, याचे त्याने प्रत्यंतर त्याने दिले. त्याने यावेळी २६ ट्रायबेक जिंकले. दुसरा सेट एक तास आणि ४४ मिनिटे चालला. या वर्षातील अमेरिकन ओपनमधील सर्वांत दीर्घकाळ चाललेला हा सेट ठरला.

हे ही वाचा:

कोपर्डी हत्याप्रकरणातील आरोपी जितेंद्र शिंदेची येरवडा कारागृहात आत्महत्या !

जळगावच्या भाषणात उद्धव ठाकरेंची जळजळ

‘चिंतामणी’च्या मिरवणुकीत चोरट्यांचा जल्लोष

राजस्थानमध्ये बलात्कारित महिला तासनतास होती रस्त्यावर !

जोकोव्हिचने सामन्यातील दुसरा सर्व्हिस ब्रेक मिळवला आणि तिसऱ्या सेटमध्ये ३-१ अशी आघाडी घेतली. जोकोव्हिच सेट, सामना आणि चॅम्पियनशिपवर सहजच शिक्कामोर्तब करेल, असे वाटत असतानाच मेदवेदेव्हने ब्रेकपॉइंट परत मिळवून शानदार प्रत्युत्तर दिले. परंतु जोकोव्हिचने आणखी एक सर्व्हिस ब्रेक जिंकून मेदवेदेव्हवर पुन्हा दबाव आणला. त्यानंतर जोकोव्हिचने सेट, सामना आणि विक्रमी २४व्या ग्रँडस्लॅमला गवसणी घातली.

Exit mobile version