जोकोविचने सर केला ‘एव्हरेस्ट’

जोकोविचने सर केला ‘एव्हरेस्ट’
फ्रेंच ओपन स्पर्धा आणि रफाएल नदाल हे समीकरण सगळ्यांनाच माहिती आहे. रफाएल नदाल आपल्या आता पर्यंतच्या कारकीर्दीत फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत १०५ सामने जिंकला आहे आणि केवळ २ सामने हरला आहे. पण हे समीकरण आता विस्कटताना दिसत आहे. फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रथमच नदालला पराभवाचा सामना करावा लागला आहे आणि हा पराक्रम केला आहे तो जागतिक टेनिसमधे पहिल्या क्रमांकावर असणाऱ्या नोवान जोकोविच याने.

रफाएल नदाल यापूर्वी केवळ २ वेळा फ्रेंच ओपन स्पर्धेमध्ये सामना हरला आहे. २००९ मधे स्वीडनच्या रॉबिन सॉडरलिंग विरुद्ध आणि २०१५ मधे नोवान जोकोविच विरुद्ध. २००५ साली पहिल्यांदा फ्रेंच ओपन नदालने जिंकली आणि नंतर क्ले कोर्टवर नदालने आपले साम्राज्य उभ करायला सुरुवात केली. १६ वर्षात त्याने १३ वेळा फ्रेंच ओपन स्पर्धा जिंकली आहे म्हणून ‘ किंग ऑफ क्ले ‘ हा किताब त्याला लोकांनी बहाल केला आहे.

फ्रेंच ओपनच्या या किंगला यावर्षी मात्र पराभवाचा आणि प्रथमच उपांत्य फेरीत पराभव पत्करावा लागला आहे. जागतिक टेनिस क्रमवारीत नंबर एक वर असणाऱ्या नोवान जोकोविच याने हा पराक्रम करून दाखवला आहे. रफाएल नदाल याला फ्रेंच ओपन मध्ये हरवणे कोणाच्याही विचारांच्या पलिकडलं आहे. पण हे शिवधनुष्य जोकोविचने पेलून सामना जिंकून दाखवला. जोकोविचने सामना जिंकला तरी पहिला सेट हा नदालने ३-६ असा जिंकला होता. पण ४ तास ११ मिनिटं टेनिसच्या मैदानात किंग ऑफ क्ले समोर उभं राहून जोकोविचने नंतरचे सेट ६-३, ७-६ (४), ६-२ असे जिंकत सामनाही आपल्या खिशात घातला आणि फ्रेंच ओपन स्पर्धेच्या अंतिम सामन्यात प्रवेश केला. हा सामना जिंकून जोकोविचने आपल्या नावावर दोन विक्रम नोंदवले एक म्हणजे नदालला फ्रेंच ओपनच्या उपांत्य फेरीत हरवण्याचा विक्रम आणि जोकोविच हा एकमेव खेळाडू आहे ज्याने फ्रेंच ओपनमध्ये २ वेळा रफाएल नदालला हरवलं आहे. असे २ विक्रम जोकोविचने आपल्या नावावर केले आहेत. “नदाल समोर फ्रेंच ओपनमध्ये उभं राहायचं म्हणजे माउंट एवरेस्ट चढण्यासारखं आहे” असे मत सामन्यानंतर नोवाक जोकोविच याने व्यक्त केले. नोवाक जोकोविच अंतिम फेरीत टेनिस क्रमवारीत ५ व्या क्रमांकावर असणाऱ्या स्टेफानो सीतसीपास याच्याशी लढणार आहे.

Exit mobile version