२६० मैल दूर अवकाशातून व्हिडीओ आला, विल्यम्स म्हणाल्या, दिवाळीच्या शुभेच्छा!

व्हाईट हाऊस दिव्यांनी उजळले

२६० मैल दूर अवकाशातून व्हिडीओ आला, विल्यम्स म्हणाल्या, दिवाळीच्या शुभेच्छा!

भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांनी दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सुनीता विल्यम्स यांनी आंतरराष्ट्रीय अंतराळस्थानकावरून (आयएसएस) व्हिडीओ संदेश जारी करत दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अमेरिकेच्या व्हाईट हाऊसमध्ये दिवाळी निमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांच्यासह अवकाशातून सुनीता विल्यम्स यांनी एक व्हिडिओ शेअर करत संपूर्ण जगाला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. संपूर्ण व्हाईट हाऊस दिव्यांनी सजले होते. या कार्यक्रमात भारतीय अमेरिकन स्थानिक पोशाख परिधान करून आले होते. सर्वांनी एकमेकांना सणाच्या शुभेच्छा दिल्या.

नासामधील भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स व्हिडीओमध्ये म्हणाल्या, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाकडून दिवाळीच्या शुभेच्छा. व्हाईट हाऊसला आणि आज जगभरात दिवाळी साजरी करणाऱ्या सर्वांना मी दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा देऊ इच्छितो. यावर्षी मला आंतरराष्ट्रीय अंतराळस्थानकावर (आयएसएस) पृथ्वीपासून २६० मैल दूर दिवाळी साजरी करण्याची अनोखी संधी मिळाली आहे.
हे ही वाचा : 
लबाडाघरचं आमंत्रण जेवल्याशिवाय खरं नाही !
ठाणे महानगरपालिका ऍथलेटिक्स प्रशिक्षण योजनेच्या खेळाडूंची विद्यापीठ स्पर्धात भरारी
दिल्ली वक्फ बोर्डाने वक्फ कायद्यातील बदलांना पाठींबा दिल्यानंतर जेपीसी बैठकीत गोंधळ
प्रभू श्रीराम, सावरकरांचा डाव्या संघटनांकडून अपमान, अभाविप कार्यकर्त्यांचा संताप!
माझ्या वडिलांनी आम्हाला दिवाळी आणि इतर भारतीय सणांची शिकवण देऊन आपली सांस्कृतिक मुल्ये जपण्यास शिकविले. दिवाळी हा आनंदाचा क्षण असल्याचे सुनीता विल्यम्स यांनी म्हटले. तसेच सुनिता विल्यम्स यांनी व्हाईट हाऊसमध्ये दिवाळी साजरी केल्याबद्दल राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांचे आभार मानले.

 

या कार्यक्रमात ६०० हून अधिक प्रतिष्ठित भारतीय अमेरिकन नागरिक सहभागी झाले होते. राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांनी देखील या कार्यक्रमाला संबोधित केले. दरम्यान, सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर बोईंग दीर्घकाळापासून अंतराळात अडकल्या आहेत. दोघांनाही परत आणण्यासाठी नासा पूर्ण प्रयत्न करत आहे. फेब्रुवारी २०२५ मध्ये पृथ्वीवर परत येण्याची शक्यात वर्तवली जात आहे.

Exit mobile version