भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांनी दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सुनीता विल्यम्स यांनी आंतरराष्ट्रीय अंतराळस्थानकावरून (आयएसएस) व्हिडीओ संदेश जारी करत दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अमेरिकेच्या व्हाईट हाऊसमध्ये दिवाळी निमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांच्यासह अवकाशातून सुनीता विल्यम्स यांनी एक व्हिडिओ शेअर करत संपूर्ण जगाला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. संपूर्ण व्हाईट हाऊस दिव्यांनी सजले होते. या कार्यक्रमात भारतीय अमेरिकन स्थानिक पोशाख परिधान करून आले होते. सर्वांनी एकमेकांना सणाच्या शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमात ६०० हून अधिक प्रतिष्ठित भारतीय अमेरिकन नागरिक सहभागी झाले होते. राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांनी देखील या कार्यक्रमाला संबोधित केले. दरम्यान, सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर बोईंग दीर्घकाळापासून अंतराळात अडकल्या आहेत. दोघांनाही परत आणण्यासाठी नासा पूर्ण प्रयत्न करत आहे. फेब्रुवारी २०२५ मध्ये पृथ्वीवर परत येण्याची शक्यात वर्तवली जात आहे.
#WATCH | Washington DC | White House Diwali Celebrations | NASA Astronaut Sunita Williams shares a video message on Diwali from the International Space Station.
She says, "Greetings from the ISS. I want to extend my warmest wishes for a Happy Diwali to everyone celebrating… pic.twitter.com/YEv3wNAxW9
— ANI (@ANI) October 28, 2024