भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वाढदिवसानिमित्त एक अनोखा उपक्रम राबवण्यात आला. आशिष मेरखेड व श्रद्धाताई मेरखेड यांच्या वतीने गरजू शालेय मुलांना सायकलचे वाटप करण्यात आले. या उपक्रमाचे नागपूर आणि परिसरात कौतुक होत आहे.
विविध प्रकारच्या सामाजिक कार्यात हे मेरखेड दाम्पत्य नेहमी पुढाकार घेत असतात. आज मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधून त्यांनी गरजू मुलांना सायकल वाटप करण्याचे ठरवले. त्यानुसार त्यांनी आज सायकलचे वाटप केले. विशेष म्हणजे या कार्यक्रमास मंत्री चंद्रशेखर बावनकुळे स्वतः उपस्थित होते. यावेळी त्यांचा मेरखेड दाम्पत्य यांच्या वतीने सत्कार करून त्यांना वाढदिवसाच्या शुभेछ्या देण्यात आल्या.
हेही वाचा..
खासगी प्रवासी वाहतूक : कंपन्यांना एकाच नियमावलीअंतर्गत आणणार
मौलवीच्या त्रासाला कंटाळून मुस्लिम पिता-पुत्राने स्वीकारला ‘हिंदू धर्म’
राष्ट्रीय स्टार्टअप दिवसाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार उद्घाटन
गर्दीमुळे स्टीव्ह जॉब्सच्या पत्नी पडल्या आजारी, महाकुंभात स्नान तूर्तास नाही!
यावेळी बोलताना मंत्री बावनकुळे म्हणाले, आज माझ्या वाढदिवसानिमित आशिष मेरखेड व श्रद्धाताई मेरखेड यांनी गरजू मुलांना सायकल वाटप केले. याप्रसंगी आवर्जून उपस्थित राहता आले. माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्या मुलांना सायकल मिळाल्याचा आनंद मिळाला ही माझ्यासाठी सर्वाधिक समाधानाची बाब आहे. हे समाधान मला मिळवून दिल्याबद्दल आशिष मेरखेड व श्रद्धाताई मेरखेड यांना धन्यवाद देतो. यावेळी उपस्थित नागरिक बंधू भगिनींनी बावनकुळे यांना शुभेछ्या दिल्या.