देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा १७ सप्टेंबर रोजी ७४ वा वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त अजमेर शरीफ दर्ग्याच्यावतीने मोठी घोषणा करण्यात आली आहे. अजमेर शरीफ दर्ग्याच्यावतीने १७ सप्टेंबर रोजी चार हजार किलो शाकाहारी अन्नाचे वितरण केले जाणार आहे.
अजमेर शरीफ दर्गा प्राधिकरणाने जारी केलेल्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आणि ‘सेवा पखवाडा’च्या संयोगाने अजमेर दर्गा शरीफ येथील ऐतिहासिक आणि जगप्रसिद्ध ‘बडी शाही देघ’ पुन्हा एकदा वापरला जाईल. ५५० वर्षांची परंपरा चालू ठेवत चार हजार किलो शाकाहारी अन्न तयार करून वितरित केले जाणार आहे.
हे ही वाचा..
योगी आदित्यनाथ यांचा राहुल गांधींवर प्रहार
प्रशिक्षणार्थी सैनिकाला बांधून मैत्रिणीवर बलात्कार?
जम्मू- काश्मीर: कुपवाडातील जंगलामधून लष्कराला सापडला मोठा शस्त्रसाठा
चंदीगडमध्ये माजी पोलिसांच्या घरी ग्रेनेड स्फोट, १ अटक, २ संशयित फरार !
अजमेर शरीफ दर्गाचे नशीन सय्यद अफशान चिश्ती यांनी एएनआयशी बोलताना सांगितले की, लोकांना शाकाहारी जेवणाचे वाटप केले जाईल. तसेच नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त देशातील धार्मिक स्थळांवर सेवा कार्यक्रम आयोजित केले जातील. पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त आम्ही चार हजार किलो शाकाहारी अन्न तयार करणार असून त्यामध्ये तांदूळ, शुद्ध तूप आणि सुक्या मेव्याचा समावेश असणार आहे. यासोबतच आजूबाजूच्या गुरूंना आणि गरीब लोकांनाही लंगर दिला जाणार आहे. पंतप्रधान मोदींच्या वाढदिवशी त्यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करणार असल्याचेही ते म्हणाले. तसेच संपूर्ण लंगरचे आयोजन हे ‘इंडियन मायनॉरिटीज फाउंडेशन’ आणि अजमेर शरीफच्या ‘चिश्ती फाऊंडेशन’तर्फे केले जात आहे, अशी माहिती त्यांनी दिली आहे. भक्त आणि स्वयंसेवक कुराणमधील श्लोकांचे पठण करतील. तसेच गाणी, कव्वाली गायल्या जाणार आहेत.