पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवार, १२ फेब्रुवारी रोजी नवनियुक्त तरुणांना १ लाखांहून अधिक नियुक्ती पत्रांचे वाटप केले. सकाळी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे नवनियुक्त तरुणांना नियुक्ती पत्रांचे वाटप करण्यात आले आहे. यावेळी पंतप्रधान मोदींनी नवी दिल्लीतील एकात्मिक संकुल ‘कर्मयोगी भवन’च्या पहिल्या टप्प्याची पायाभरणी केली.
देशभरात ४७ ठिकाणी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमांतर्गत, केंद्र सरकारच्या विभागांमध्ये भरती होत असून याला राज्य सरकारे आणि केंद्रशासित प्रदेशांचा या उपक्रमाला पाठींबा आहे. नवनियुक्त तरुण हे महसूल विभाग, गृह मंत्रालय, उच्च शिक्षण विभाग, अणुऊर्जा विभाग यांसारख्या विविध मंत्रालय आणि विभागांमध्ये कार्यरत असणार आहेत. तसेच संरक्षण मंत्रालय, वित्तीय सेवा विभाग, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, आदिवासी व्यवहार मंत्रालय आणि रेल्वे मंत्रालयातील विविध पदांवर भरती करून सरकारसोबत काम करतील.
देशभरात ४७ ठिकाणी रोजगार मेळावे आयोजित करण्यात आले होते. यावेळी केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये नियुक्त केलेल्या १ लाखाहून अधिक तरुणांना नियुक्ती पत्रांचे वाटप केले गेले. पंतप्रधान कार्यालयाने एका निवेदनात म्हटले होते की, “रोजगार मेळावा हे देशातील रोजगार निर्मितीला सर्वोच्च प्राधान्य देण्याच्या पंतप्रधानांच्या वचनबद्धतेची पूर्तता करण्यासाठी एक पाऊल आहे. या मेळ्यातून रोजगार निर्मितीला चालना मिळणे आणि तरुणांना त्यांच्या सक्षमीकरणासाठी आणि विकासात सहभागासाठी संधी उपलब्ध करून देणे अपेक्षित आहे.”
हे ही वाचा:
भारताची मुत्सद्देगिरी, ८ नौदल अधिकारी कतारमधून सुटले
राजदीप सरदेसाईंची पत्नी सागरिकावर तृणमूल मेहेरबान, मिळाले राज्यसभेचे तिकीट
बापरे! जिल्हा परिषदेच्या शाळेच्या छतावर आढळला नवजात अर्भकाचा मृतदेह!
हमास बोगदा थेट गाझामध्ये संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयाखाली सापडला
नव्याने नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांना आयजीओटी कर्मयोगी पोर्टलवर ‘कर्मयोगी प्रारंभ’ या ऑनलाइन मॉड्यूलद्वारे स्वतःला प्रशिक्षित करण्याची संधीही मिळत आहे. विविध सरकारी विभागांमध्ये सर्व नवनियुक्त कर्मचाऱ्यांसाठी हा ऑनलाइन ओरिएंटेशन कोर्स आहे. पोर्टलवर कर्मयोगी प्रारंभमध्ये शिकण्यासाठी ८८० हून अधिक ई-लर्निंग कोर्सेस उपलब्ध करून देण्यात आले आहेत.