लालबागच्या राजाच्या दरबारी भाविक, सुरक्षा रक्षकांमध्ये वादावादी

लालबागच्या राजाच्या दरबारी भाविक, सुरक्षा रक्षकांमध्ये वादावादी

राज्यासह मुंबईत गणेशोत्सवाला आजपासून मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. यंदा निर्बंध नसल्यामुळे भाविकांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे. लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी कालपासून लांबच लांब रांग लावल्याचं दृश्य होतं. सकाळपासून भाविकांनी दर्शन घेण्यासाठी गर्दी केली असून भाविक आणि सुरक्षा रक्षकांमध्ये बाचाबाची झाल्याची माहिती समोर आली आहे.

लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी देशभरातून नागरिक मुंबईत दाखल होत असतात. यंदा तब्बल दोन वर्षांनी निर्बंधमुक्त गणेशोत्सव साजरा केला जात आहे. अशातच लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी अनेक भाविकांनी गर्दी केली आहे. यावेळी मुखदर्शनाच्या रांगेतून जाताना भाविक आणि सुरक्षा रक्षकांमध्ये वाद झाला.

दर्शनावेळी भाविक आणि सुरक्षा रक्षकांमध्ये वाद झाला. यावेळी शाब्दिक चकमक झाली तर काही वेळात धक्क्बुक्कीही करण्यात आली. पोलिसांनी मध्यस्ती करत हे वाद मिटवले आहे. लालबाग राजाच्या दर्शानासठी दोन वर्षांनंतर अलोट गर्दी बघायला मिळत आहे याचपार्श्वभूमीवर मुंबई पोलीस, पालिका कर्मचारी आणि  मंडळाच्या सदस्यांकडून गर्दीचं नियोजन केलं जातंय.

हे ही वाचा:

‘वर्षा’ बंगल्यात बाप्पा विराजमान

गणपती बाप्पा मोरया… घरोघरी लाडक्या बाप्पाचं आगमन

मुंबईतील ‘या’ गणेशोत्सव मंडळाने काढला तीनशे कोटींचा विमा

“दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंकडे बोलण्यासारखं काय आहे?”

आज राज्यासह देशभरात गणेशाचं स्वागत केलं जात आहे. मानाच्या गणपतीच्या मिरवणुका आणि प्रतिष्ठापना सुरू असून ढोलताशांच्या गजरात गणेशाचे स्वागत केले जात आहे. घरगुती बाप्पांचं आगमनही यंदा उत्साहात झालं आहे.

Exit mobile version