एअर इंडियाच्या रजेवर गेलेल्या २५ कर्मचाऱ्यांना कायमची ‘रजा’

केबिन क्रू चे सदस्य एकाचवेळी रजेवर गेल्याने विमान सेवेत अडथळे

एअर इंडियाच्या रजेवर गेलेल्या २५ कर्मचाऱ्यांना कायमची ‘रजा’

सामूहिक रजेवर गेलेल्या कर्मचाऱ्यांविरोधात ‘एअर इंडिया एक्सप्रेस’ एअरलाइन्सने मोठी कारवाई केली आहे. रजेवर गेलेल्या २५ कर्मचाऱ्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. केबिन क्रू चे सदस्य एकाचवेळी रजेवर गेल्याने एअर इंडिया एक्सप्रेसची पंचाईत झाल्याचे चित्र आहे. यामुळे एअर इंडियाला बुधवारी काही उड्डाणे रद्द करावी लागली होती. अशातच गुरुवार, ९ मे रोजीसुद्धा एअर इंडिया एक्सप्रेसची ७० हून अधिक विमाने रद्द झाली आहेत किंवा उशिराने उड्डाण सुरु आहेत. प्रवाशांना याचा त्रास सहन करावा लागत असल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.

एअर इंडिया एक्सप्रेसने कर्मचाऱ्यांना कंपनीच्या दैनंदिन कारभारात अडथळा आणल्याबद्दल आणि नियुक्तीच्या अटी व शर्तींचे उल्लंघन केल्याबद्दल दोषी मानून बडतर्फीची नोटीस दिली आहे. दरम्यान, एअर इंडिया एक्सप्रेसच्या १०० हून अधिक क्रू मेंबर्सनी बुधवारी आजारी असल्याची सबब देत अचानक रजा घेतल्या. त्यामुळे एअर इंडिया एक्सप्रेसची ८० हून अधिक उड्डाणं रद्द करण्यात आली. या प्रकाराबाबत असंही सांगितलं जात आहे की, कर्मचाऱ्यांचं अचानक रजा घेणं म्हणजे, एक प्रकारचा संपच आहे. यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. कर्मचाऱ्यांनी बंड पुकारल्यामुळे एअर इंडियावर उड्डाण रद्द करण्याची वेळ आली आहे.

एअर इंडिया एक्सप्रेसने अखेर केबिन क्रू च्या २५ सदस्यांना बर्खास्त केलं आहे. नियमांचा हवाला देऊन एअर इंडियाने ही कारवाई केली आहे. ज्या कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढून टाकण्यात आलय, त्यात सीक लीववर गेलेले कर्मचारी आहेत. माहितीनुसार, जी विमाने गुरुवारी रद्द करण्यात आली आहेत, त्यात चेन्नई-कोलकाता, चेन्नई-सिंगापूर आणि त्रिचे-सिंगापूर ही विमानं आहेत. लखनऊ ते बंगळुरु उड्डाण उशिराने होणार आहे.

हे ही वाचा:

करकरे, परमबीर यांनी बॉम्बस्फोट कटाची कबुली देण्यासाठी आणला दबाव!

संभाजीनगर, धाराशिव विरोधातील लोक महाविकास आघाडीचे!

‘महाराष्ट्र विधान परिषदेच्या ४ जागांसाठी निवडणुका तारखा जाहीर’

पवारांनी ठाकरेंची भविष्यवाणी केली, फडणवीसांच्या मतावर शिक्कामोर्तबसुद्धा

एअर इंडिया एक्सप्रेसमध्ये काम करणारे १०० हून अधिक कर्मचारी बुधवारी कामावर आले नाहीत. या सर्व कर्मचाऱ्यांनी एकत्र सीक लीवसाठी अर्ज केला. मोबाइल फोन ऑफ केला. त्यामुळे बुधवारी विमानांच्या ऑपरेशन्समध्ये एअर इंडियाला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. नोकरीच्या नवीन अटींना या सर्व कर्मचाऱ्यांचा विरोध आहे. एअर इंडिया एक्सप्रेसच्या प्रवक्त्याने बुधवारी सांगितलं की, “आमच्या केबिन क्रूचे अनेक सदस्य मंगळवारी रात्री ड्युटीवर येण्याआधी आजारी पडले. यामुळे अनेक विमानं रद्द करावी लागली किंवा काही उशिराने उड्डाण सुरु होती.”

Exit mobile version