दिशा सालियनच्या वडिलांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली असून मृत्यू प्रकरणात सामुहिक बलात्कार, हत्या झाल्याचा आरोप केला आहे. ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे, माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर या याचिकेत आरोप करण्यात आले आहेत. यामुळे पुन्हा एकदा हे प्रकरण प्रकाशझोतात आले आहे. दरम्यान, बॉलीवूड दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत याचे वडील के के सिंग यांनी गुरुवारी दिशा सालियन हिच्या वडिलांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेचे समर्थन केले आहे. यानंतर त्यांनी आशा व्यक्त केली आहे की, आता दोन्ही घटनांवर निष्कर्ष काढता येईल.
के के सिंग म्हणाले की, दिशा सालियन हिचे वडील न्यायालयात का गेले याची कारणे आणि त्यामागची प्रेरणा माहित नाही. पण, त्यांनी जे केले आहे ते योग्य आहे. याद्वारे आत्महत्या होती की हत्या याचा निष्कर्ष निघू शकतो आणि सुशांतच्या प्रकरणात काय घडले हे देखील कळू शकते,” असा विश्वास के के सिंग यांनी व्यक्त केला आहे.
के के सिंग यांनी त्यांच्या मुलाच्या आणि सालियनच्या मृत्यूमध्ये काही संबंध आहे का यावर भाष्य करण्यास नकार दिला. ते म्हणाले की, “मी काहीही बोलू शकत नाही, ज्या विषयावर मला माहिती नाही त्या विषयावर मी कसे बोलू शकतो.” पुढे सिंग म्हणाले की, त्यांना महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आशा आहे आणि ते योग्य निर्णय घेतील असा त्यांचा विश्वास आहे. “सरकारवर आशा आहे, सरकार बदलले आहे आणि मला सध्याच्या मुख्यमंत्र्यांवर विश्वास आहे, ते जे काही करतील ते ते योग्यरित्या करतील आणि लवकर करतील.”
हे ही वाचा:
कोस्टल रोड येथे ३० वर्षीय तरुणाची समुद्रात उडी घेऊन आत्महत्या
तरुणीची गळा दाबून हत्या, मृतदेह दगडाला बांधून कालव्यात फेकला, आरोपी आसिफला अटक!
भरवेगात स्कुटी चालविणाऱ्याला जाब विचारला म्हणून एकाची हत्या
भारतीय विद्यार्थी बदर खान अमेरिकेत करत होता हमासचा प्रचार; केली अटक
दिशा सालियन ही ८ जून २०२० रोजी मृतावस्थेत आढळली. २०२३ मध्ये, मुंबई पोलिसांनी दिशा सालियनच्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी तीन सदस्यीय विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन केले. मुंबई पोलिसांनी या प्रकरणात अपघाती मृत्यूचा गुन्हा दाखल केला. १४ जून २०२० रोजी बॉलिवूड अभिनेता सुशांत राजपूत त्याच्या वांद्रे येथील राहत्या घरी मृतावस्थेत आढळला, यामुळे मोठा वाद निर्माण झाला आणि नंतर तपास केंद्रीय अन्वेषण विभागाकडे सोपवण्यात आला.