दिशा सालियन मृत्यू प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. बुधवारी सगळ्या माध्यमांनी सीबीआयने या प्रकरणात दिशा सालियनचा मृत्यू अपघाती असल्याचा निष्कर्ष काढल्याचे वृत्त दाखविले. पण खरोखरच सीबीआयने तसा दावा केला होता का, असा सवाल उपस्थित झाला आहे.
यासंदर्भात फ्री प्रेस जर्नलने वृत्त दिले आहे की, दिशा सालियन प्रकरण मुळात सीबीआयकडे कधी नव्हतेच असा दावा एका सीबीआय अधिकाऱ्याने केला आहे. त्यामुळे जर हे प्रकरण सीबीआयकडे नव्हतेच तर मग त्याचा निष्कर्ष सीबीआय कसा काय काढू शकेल, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
सीबीआय अधिकाऱ्याने फ्री प्रेस जर्नलला सांगितले की, हे प्रकरणच आमच्याकडे नाही मग आम्ही त्यासंदर्भातील निष्कर्ष कसा काय काढू. मुळात मुंबई उच्च न्यायालयाने यासंदर्भात करण्यात आलेली याचिकाच फेटाळलेली आहे. त्यामुळे हे प्रकरण सीबीआयकडे आलेच नव्हते.
हे ही वाचा:
‘स्निफर’ डॉग ठेवणार आता परदेशी टपालावर नजर
नाशिकपाठोपाठ अरुणाचल प्रदेशही थरथरला
अमेरिकेत पुन्हा गोळीबार, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
महाराष्ट्रातील एकही गाव कर्नाटकात जाणार नाही
२६ ऑक्टोबर २०२०ला यासंदर्भातील याचिका सर्वोच्च न्यायालयात करण्यात आली होती. पण न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयात जाण्याची सूचना याचिकादारांना केली. त्याप्रमाणे याचिकादार मुंबई उच्च न्यायालयात गेले. तिथे नोव्हेंबर २०२०मध्ये न्यायालयाने ही याचिका फेटाळली आणि सीबीआय चौकशी करण्याची गरज नसल्याचे म्हटले. त्यामुळे जर सीबीआयला चौकशीचे अधिकारच न्यायालयाने दिलेले नाहीत तर मग तिचा मृत्यू हा अपघाती होता, हा दावा सीबीआय कसा करेल, असा प्रश्न विचारला जात आहे.
— nitesh rane (@NiteshNRane) November 23, 2022
याबाबत याच फ्री प्रेस जर्नलच्या बातमीचा हवाला देत भाजपा आमदार नितेश राणे यांनीही असा कोणताही निष्कर्ष सीबीआयने काढलेला नाही. हे प्रकरणच मुळात सीबीआयकडे सोपविण्यात आलेले नाही. असे म्हणत ज्यांनी हे वृत्त प्रसिद्ध केले त्याचे खंडन केले.