राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना झाले आहेत. मुख्यमंत्री पदाबाबतची चर्चा ही दिल्लीमध्ये होणार असून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत ही बैठक पार पडणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे राज्याचा पुढील मुख्यमंत्री कोण?, हे लवकरच स्पष्ट होणार असल्याचे चित्र आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीमध्ये १०.३० च्या सुमारास ही बैठक होणार आहे. गृहमंत्री शाह यांच्यासोबतच्या बैठकीला मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार देखील उपस्थित राहणार आहेत. बैठकीसाठी उपमुख्यमंत्री फडणवीस दिल्लीला रवाना झाले असून काही वेळात मुख्यमंत्री शिंदे आणि अजित पवार देखील रवाना होणार आहेत. मुख्यमंत्री पदासाठी ही बैठक असणार असून कोणाला किती मंत्री पदे द्यायची याबाबत आज निर्णय घेण्यात आला आहे आणि तो भाजपा हायकमांडने मान्य देखील केल्याची माहिती आहे.
हे ही वाचा :
थोडी लाज शिल्लक असेल तर तोंड काळे करा…
बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराविरोधात आंदोलनाचे नेतृत्व करणारे साधू चिन्मय प्रभू यांना अटक
तेलंगणाने अदानी समूहाचा निधी नाकारला
काँग्रेस अध्यक्षपदाच्या राजीनाम्यावर पूर्ण विराम, पटोले म्हणाले, मी राजीनामा दिलेला नाही!
दरम्यान, महायुतीला निवडणुकीमध्ये २३० जागा मिळाल्या. यामध्ये भाजपाला १३२, शिवसेना शिंदे गटाला ५७ आणि राष्टवादी अजित पवार गटाला ४१ जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे संख्याबळाचा विचार केला तर भाजपचा मुख्यमंत्री होण्याची शक्यता आहे. परंतु, मुख्यमंत्री पदासाठी शिंदे गट आणि अजित पवार गट देखील इच्छुक असल्याची माहिती आहे. त्यामुळे आता गृहमंत्री शाह यांच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री पदाचा आज तिढा सुटले असे दिसत आहे.