‘द केरळ स्टोरी’च्या टीमचे आयुष्य पूर्वीसारखे राहणार नाही, असं विवेक अग्निहोत्री का म्हणाले?

दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांचे 'द केरळ स्टोरी'च्या टीमसाठी पत्र

‘द केरळ स्टोरी’च्या टीमचे आयुष्य पूर्वीसारखे राहणार नाही, असं विवेक अग्निहोत्री का म्हणाले?

‘द केरळ स्टोरी’ हा चित्रपट प्रदर्शनापूर्वी वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. मात्र, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरत आहे. चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी या चित्रपटाच्या यशानंतर ट्वीट करत ‘द केरळ स्टोरी’च्या टीमसाठी एक पत्र लिहले आहे.

विवेक अग्निहोत्री यांनी संदेशात काय म्हटले आहे?

‘मी महान चित्रपट निर्माते आणि चित्रपट समीक्षकांकडून ऐकत मोठा झालो की, कलेचा एकमेव उद्देश हा आहे की लोकांना त्यांच्या स्वतःच्या श्रद्धा आणि पूर्वाग्रहांवर शंका घेण्यास भाग पाडणे. सिनेमा समाजाचे वास्तव प्रतिबिंबित करतो, हे सुद्धा ऐकले होते. एक अलिखित नियम आहे की, जेव्हा वाईट गोष्टी घडतील तेव्हा त्या कलेने उघड करणे हा कलाकाराचा धर्म आहे. मी काही चुकीचे ऐकत आलो आहे का?’ असा प्रश्न विवेक अग्निहोत्री यांनी विचारला आहे.

‘नाही. विचार बरोबर आहे. पण, असे म्हणणारे लोक चुकीचे आहेत. ते भाषण स्वातंत्र्याबद्दल बोलतात परंतु सेन्सॉरशिपही वापरतात. ते धर्मनिरपेक्षतेबद्दल बोलतात पण ‘इतर’ आणि जातीय द्वेषाचे पालन करतात. ते मानवी हक्कांबद्दल बोलतात पण दहशतवादी आणि नक्षलवाद्यांचे समर्थन करतात. ते वाईटाचा पर्दाफाश करण्याविषयी बोलतात पण वाईटाचे सत्य झाकून ठेवतात.

मला हे लक्षात आलं आहे की, आधुनिक काळात मीडिया आणि राजकारण जे करू शकत नाही ते करण्याची ताकद सिनेमात आहे. ते अस्वस्थ असे वास्तव मांडू शकते, इतिहास दुरुस्त करू शकते, सांस्कृतिक युद्ध लढू शकते आणि मोठ्या हितासाठी राष्ट्राची सॉफ्ट पॉवर देखील बनू शकते.

भारतात असा सिनेमा बनवणे सोपे नाही. मी ‘बुद्ध इन ए ट्रॅफिक जॅम’, ‘द ताश्कंद फाईल्स’ आणि ‘द काश्मीर फाईल्स’ मधून प्रयत्न केला. माझ्यावर शारीरिक, व्यावसायिक, सामाजिक आणि मानसिक अत्याचार झाले.

माझा आगामी चित्रपट ‘द व्हॅक्सिन वॉर’ हा एक सकारात्मक चित्रपट आहे, जो भारताच्या सर्वात मोठ्या यशाच्या कथेचा सिनेमा आहे. यावर्षी हा सिनेमा प्रदर्शित होईल आणि मला खात्री आहे की त्यावरही टीका केली जाईल. कारण, त्यांना भारत यशस्वी झालेला पाहवत नाही.

कारण, सत्य बाहेर येता कामा नये.
भारताने ते साजरे करू नये.

अलीकडेच, जेव्हा मी कोलकाता येथे जाहीर केले की, आगामी ‘द दिल्ली फाईल्स’ हा सिनेमा १९४६/४७/७१ च्या बंगाल नरसंहाराबद्दल आहे. त्यानंतर माझ्यावर हल्ला झाला. माझ्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आले. मला कोलकात्याच्या एका मॉलमध्ये माझ्या स्वतःच्या पुस्तकांवर स्वाक्षरी करण्यास बंदी घालण्यात आली होती.
भारतात असे काही करण्यासाठी सर्वस्वाचा त्याग करण्यास तयार असले पाहिजे. भविष्यासाठी स्वर्ग निर्माण करण्यासाठी, आपण नरकात राहणे आवश्यक आहे.

हे ही वाचा:

लष्करी परेडवर केलेल्या हल्ल्याबद्दल तेहरानमध्ये इराणी-स्विडिश नागरिकाला फाशी

ऑनलाइन घोटाळे करण्यासाठी केली होती एक हजार लोकांची तस्करी

जंतरमंतरची वाटचाल शाहीन बागेकडे

दिल्लीत हुक्का बारमध्ये १७ वर्षीय तरुणाला घातली गोळी

माझा विश्वास आहे की, माझी सरस्वती मातेने माध्यम बनण्यासाठी निवड केली होती आणि मी स्वतःला तिच्या स्वाधीन केले. यामुळे मला कट्टरपंथी आणि सत्य, न्याय, धर्माच्या शत्रूंशी लढण्याचे बळ मिळाले.

विपुल शहा आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे प्रथम त्यांच्या या धाडसी प्रयत्नासाठी अभिनंदन. त्याच वेळी, मी तुम्हाला एक वाईट बातमी देखील सांगतो की, इथून पुढे तुमचे आयुष्य पूर्वीसारखे राहणार नाही. तुम्हाला द्वेष मिळेल. तुम्हाला गुदमरल्यासारखे वाटेल. अनेक वेळा तुम्ही गोंधळून जाऊ शकता आणि निराश होऊ शकता. पण लक्षात ठेवा, देव ज्या खांद्यावर बदल घडवण्याची जबाबदारी टाकतो त्यांची तो परीक्षा घेतो, असे विवेक अग्निहोत्री आपल्या संदेशात म्हणाले आहेत.

Exit mobile version