27 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरविशेषमोपला दंगलीवर चित्रपट बनवणारे अली अकबर यांची न्यूज डंकाला भेट

मोपला दंगलीवर चित्रपट बनवणारे अली अकबर यांची न्यूज डंकाला भेट

रामसिंहनना या सिनेमानंतर आता जीवघेण्या धमक्या येतायत, पण ते आता मागे हटण्याच्या मनस्थितीत नाहीत.

Google News Follow

Related

केरळच्या मल्लपुरममध्ये १९२१ मध्ये मोपल्यांनी न भूतो न भविष्यति असा दंगा केला. कित्येक मंदिरे भ्रष्ट करण्यात आली. दहा हजारावर हिंदू मारले गेले असा अंदाज आहे. हजारो महिलांवर बलात्कार झाले.

कम्युनिस्ट इतिहासकारांनी याला जमीनदारांविरुद्ध उठाव असे चित्र दाखवून या निर्घृण दंगलींचे उदात्तीकरण करण्याचा प्रय़त्न केला. वस्तूस्थिती सांगितली फक्त स्वातंत्र्यवीर सावरकरांनी. दिवान बहादूर सी. गोपालन नायर यांनी १९२१ मध्ये प्रसिद्ध झालेल्या मोपला रिबेलिअन या पुस्तकात दंग्याचा भयंकर तपशील दिला आहे.

२०२१ मध्ये या दंगलींला शंभर वर्ष पूर्ण झाली. त्याच्या दोन वर्ष आधी केरळ सरकारने या दंगलींचा सूत्रधार व्ही.कुनहमेद हाजी याचे महीमामंडन करणारा वरीयमकुन्नन हा सिनेमा बनवण्याची घोषणा केली. तेव्हा रामसिंहन (पूर्वाश्रमीचे अलि अकबर) या दिग्दर्शकाच्या मस्तकात भडका उडाला. या हिंदूविरोधी दंगलींची भीषणता दाखवणारा सिनेमा बनवेन, अशी घोषणा त्यांनी त्यावेळी केली होती. तो चित्रपट तयार झाला. त्या संघर्षाच्या आठवणी रामसिंहन यांनी न्यूज डंका, कारुळकर प्रतिष्ठानच्या कार्यालयात येऊन कथन केल्या. यावेळी प्रतिष्ठानच्या उपाध्यक्ष शीतल कारुळकरही उपस्थित होत्या.

हे ही वाचा:

बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या कुळाला उंची दिली ते कूळ तुम्ही बुडवलं!!

चांगली बातमी… आता ठाण्यात गाडी बदलू नका, थेट ट्रान्सहार्बरवर प्रवास करा!

छत्रपती संभाजीनगरच्या नामांतराच्या समर्थनार्थ अर्जांचा पाऊस

काबुल परराष्ट्र मंत्रालयाच्या परिसरात आत्मघातकी हल्ला ,सहा जण ठार

रामसिंहन यांनी हा चित्रपट तयार करण्याची महत्त्वाकांक्षा घरदार गहाण ठेवून प्रत्यक्षात आणली देखील. सिनेमावर काम सुरू झाले. केरळमधील डाव्या सरकारने सर्वात आधी अडथळे आणायला सुरूवात केली. शूटींगसाठी परवानगी नाकारण्यात आली. अली अकबर म्हणजेच रामसिंहन यांनी आपल्याच घराच्या आगे मागे जेवढे जमेल तेवढे शूट करून घेतले. जिथे जिथे शंभरवर्षांपूर्वी या घटना घडल्या तिथे जाऊन जमेल तितके पुरावे गोळा केले, तिथे चित्रिकरण केले. सिनेमात कलाकार काम करायला तयार होत नव्हते. मग जो तयार होईल त्याला ‘तयार’ करून काम पुढे न्यावे लागले. हा असा पहिला सिनेमा आहे, जो क्राऊड फंडीगच्या मार्गाने तयार झाला. वितरित झाला. कोणतेही प्रमोशन न करता लोकांपर्यंत पोहोचवण्यात आला.

 

मल्ल्याळममध्ये पुझा मुथल पुझा वारे( एका नदीकडून दुसऱ्या नदीकडे…) नावाने प्रदर्शित झालेला हा सिनेमा आता हिंदीत डब होऊन येतोय. पण हा सिनेमा आल्यानंतर एका दंगेखोराचे उदात्तीकरण करण्याचा अजेण्डा केरळ सरकारला बासनात बांधावा लागला हे या सिनेमाचे यश. रामसिंहनना या सिनेमानंतर आता जीवघेण्या धमक्या येतायत, पण ते आता मागे हटण्याच्या मनस्थितीत नाहीत. हिंदूंच्या मूळावर उठणाऱ्यांचा इतिहास लपवण्याचा प्रयत्न झाला. त्यानंतर इतिहासातील खलनायकांचे उदात्तीकरण करून त्यांना हिंदूंच्या माथ्यावर मारण्याचा प्रयत्न झाला. कश्मीर फाईल्सने तर फक्त एक खपली काढली आहे. मलबारमध्ये जे झालं ते कश्मीरपेक्षा भयंकर होतं. महात्मा गांधींनी खिलाफत आंदोलनाचे जोखड खांद्यावर घेतले. त्याचा परिणाम हिंदूंना भोगावा लागला. अनेक ठिकाणी दंगली उसळल्या, त्यातून हे हत्याकांड, हा अत्याचार घडला.

 

सोमवारी रामसिंहन न्यूज डंकाच्या कार्यालयात आले होते. त्यांचे अनुभव सांगत होते. मोपल्यांचा दंगा आणि त्यानंतर कश्मीरच्या मार्गावर चाललेल्या केरळबद्दल ते सांगत असताना अंगावर काटा येत होता. हा सिनेमा रिलीज करून घेण्यासाठी त्यांना सेन्सॉर बोर्डाविरुद्ध न्यायालयात दहा महिने लढावं लागलं हे ऐकून धक्काच बसला. येत्या महिन्याभरात हा सिनेमा हिंदीत येतोय. जवळच्या सिनेमागृहात येण्याची शक्यता कदाचित कमीच असेल पण हे मोपल्यांच्या अत्याचारांचा खरा काळा इतिहास प्रत्येकाने जाणून घेतलाच पाहिजे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा