भारतातील निवडणूक प्रक्रिया जाणून घेण्यासाठी १५ देशांचे राजदूत पोहचले जम्मू- काश्मीरमध्ये

भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने १५ देशांमधील राजदूतांना दिले होते निमंत्रण

भारतातील निवडणूक प्रक्रिया जाणून घेण्यासाठी १५ देशांचे राजदूत पोहचले जम्मू- काश्मीरमध्ये

जम्मू आणि काश्मीरमध्ये विधानसभा निवडणूकीसाठी मतदान सुरू असून एकूणच निवडणूक प्रक्रिया कशी असते हे पाहण्यासाठी म्हणून बुधवार, २५ सप्टेंबर रोजी विविध देशांचे राजदूत जम्मू- काश्मीरमध्ये हजर झाले आहेत. राजदूतांचे एक उच्चस्तरीय शिष्टमंडळ बडगाम आणि श्रीनगरसह विविध मतदान केंद्रांवर आले आहेत. मतदान केंद्राला दिलेल्या भेटीदरम्यान त्यांनी काही लोकांशी संवाद साधला.

भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने १५ देशांमधील राजदूतांना निमंत्रण दिले होते. या १५ देशांमध्ये अमेरिका, मेक्सिको, गयाना, दक्षिण कोरिया, सोमालिया, पनामा, सिंगापूर, नायजेरिया, स्पेन, दक्षिण आफ्रिका, नॉर्वे, टांझानिया, रवांडा, अल्जेरिया आणि फिलीपिन्स यांचा समावेश आहे.

एएनआयशी बोलताना दक्षिण आफ्रिकेच्या राजदूत लारा स्वार्ट म्हणाल्या की, “मी पहिल्यांदाच जम्मू आणि काश्मीरला भेट देत आहे. परराष्ट्र मंत्रालयाकडून येथे येण्याचे निमंत्रण मिळणे ही खरोखरच सौभाग्याची गोष्ट आहे.” रवांडामधील राजदूतांनी म्हटले की, “मला वाटते की हे खरोखर चांगले आहे तसेच सर्व व्यवस्थित आहे. निवडणूक प्रक्रिया आणि मतदान प्रक्रिया कशी सुरू आहे याबद्दल खूप चांगले स्पष्टीकरण मिळाले. आम्हाला सांगण्यात आले की मतदान सकाळी ७ वाजता सुरू झाले आणि संध्याकाळी ६ वाजेपर्यंत चालेल. प्रत्येकाने यावे आणि मतदान करावे अशी त्यांची अपेक्षा आहे.”

हे ही वाचा:

कमला हॅरिस यांच्या निवडणूक प्रचार कार्यालयावर गोळीबार

ज्या भ्रष्ट व्यक्तीला तुरुंगात टाकले त्या व्यक्तीची तुलना प्रभू श्री रामांशी होते हे अमान्य

जम्मू- काश्मीर विधानसभा निवडणुकीमध्ये ‘गुलाबी मतदान केंद्रां’ची चर्चा!

जम्मू- काश्मीरमध्ये दुसऱ्या टप्प्याचे मतदान; २३९ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत होणार बंद

टांझानियाच्या राजदूतांनी म्हटले की, अशा प्रकारची प्रक्रिया यापूर्वी कधीही पाहिला नव्हता. शिवाय, गुलाबी बूथच्या संकल्पनेबद्दलही त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. लोक मतदानासाठी उत्साही आहेत आणि ते मुलांना सोबत आणत आहेत जेणेकरून ते लोकशाही प्रक्रिया काय आहे हे त्यांना शिकवू शकतील. मी अशी प्रथा यापूर्वी कधीही पाहिली नाही, ही माझी पहिलीच वेळ आहे आणि खूप छान आहे. सिंगापूर उच्चायोगातील एका राजदूतांनी सांगितले की, भारताची निवडणूक प्रक्रिया ही सिंगापूरसारखीच आहे आणि या भेटीचे आयोजन केल्याबद्दल परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे त्यांनी आभार मानले आहेत.

Exit mobile version