27 C
Mumbai
Saturday, November 16, 2024
घरविशेषदिनेश मोंगियाचा भाजपा प्रवेश

दिनेश मोंगियाचा भाजपा प्रवेश

Google News Follow

Related

माजी क्रिकेटपटू दिनेश मोंगिया यांनी आज भारतीय जनता पक्षात प्रवेश करून राजकीय इनिंगला सुरुवात केली  आहे. मोंगिया यांनी भाजपाचे प्राथमिक सदस्यत्व स्वीकारल्याची माहिती एएनआय या वृत्त संस्थेने दिली. दिनेश मोंगिया मूळचे पंजाबचे आहेत. येत्या काही महिन्यांत पंजाबमध्ये विधानसभा निवडणुका होणार असून त्यापूर्वी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर मोंगिया म्हणाले की, मला भाजपच्या माध्यमातून पंजाबच्या जनतेची सेवा करायची आहे. भाजपशिवाय कोणताही पक्ष देशाच्या विकासासाठी काम करू शकत नाही, असंही त्यांनी नमूद केलं.

४४ वर्षीय मोंगिया यांनी २००१ मध्ये भारतीय संघासाठी पदार्पण केलं होतं. या अष्टपैलू खेळाडूनं भारतासाठी ५७ एकदिवसीय सामन्यांमध्ये १२३० धावांसह १४ विकेट्स घेतल्या. मोंगियांनी २००६ मध्ये दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर त्याच्या कारकिर्दीतील एकमेव टी-२० सामना न्यू वांडरर्स स्टेडियमवर खेळला, जिथे त्यांनी ३८ धावा केल्या होत्या. त्यांनी मे २००७ मध्ये बांगलादेशविरुद्ध ढाका येथे शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. त्यांच्या नावावर एका शतकाची नोंद आहे.

मोंगियावर आयसीएल दरम्यान सट्टेबाजी केल्याचा आरोप होता. मॅच फिक्सर, लू व्हिन्सेंटने २०१५ मध्ये लंडन न्यायालयात या भ्रष्ट कारवायांमध्ये सामील असलेल्या लोकांपैकी एक म्हणून मोंगियांच नाव घेण्यात आलं होतं. पुराव्याअभावी न्यायायलानं त्यांना सोडून दिलं होतं.

हे ही वाचा:

मोदी सरकारच्या योजनेला यश, चीनला डावलून इंटेल भारतात

विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक बारगळणार

सौरव गांगुलीला कोरोनाची लागण

कोरोना विरुद्धच्या लढाईसाठी आणखी दोन लसींना मान्यता

दरम्यान, मोंगिया यांनी त्यांच्यावर लावण्यात आलेले सर्व आरोप फेटाळून लावले. “माझ्याविरुद्ध कोणताही पुरावा नव्हता. आयसीएलमध्ये खेळणारा मी एकमेव खेळाडू होतो, ज्याला बीसीसीआयची माफी मिळाली नाही. अंबाती रायुडूनं आयसीएलमध्ये साइन अप केल्याबद्दल माफी मागितली आणि त्यानंतर भारताकडून खेळला.” असंही मोंगिया म्हणाले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
191,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा