दिनेश कार्तिकच्या ८३ धावा ठरल्या अपुऱ्या

हैदराबादचा २८७ धावांचा डोंगर

दिनेश कार्तिकच्या ८३ धावा ठरल्या अपुऱ्या

हैदराबादने बंगळुरूचा २५ धावांनी पराभव केला. त्यामुळे बंगळुरूचा या हंगामातील हा सहावा पराभव ठरला. दिनेश कार्तिकच्या ८३ धावा बंगळुरूला विजय मिळवून देऊ शकल्या नाहीत. दोन्ही संघांच्या मिळून ५०० धावांचा वर्षाव सोमवारी स्टेडिअमवर झाला.

बंगळुरूला कशीबशी २६२ धावांपर्यंत मजल मारता आली. हैदराबादने तीन विकेट गमावून २८७ धावांचे समोर ठेवलेले लक्ष्य गाठताना बंगळुरूला २५ धावा कमी पडल्या. आयपीएल हंगामात लक्ष्य गाठताना २५० धावा करणारा बंगळुरू हा पहिला संघ ठरला. ही त्यांची यंदाच्या आयपीएलमधील सर्वाधिक दुसऱ्या क्रमांकाची आणि एकूण आयपीएलमधील पाचव्या क्रमांकाची सर्वाधिक धावसंख्या ठरली. तर, हैदराबादने २७७ धावांचा विक्रम मोडला. ४३ चौकार आणि ३६ षटकारांची आतषबाजी यावेळी झाली.

हैदराबादला प्रत्युत्तर देताना विराट कोहली आणि फाफ डू प्लेसिसने आक्रमक सुरुवात केली. कोहली ४२ धावांवर बाद झाला. तर, फाफ ६२ धावांवर परतला. त्यानंतर दिनेश कार्कितने सामन्यावर पकड बसवली. त्याने ३५ चेंडूंत ८३ धावा केल्या. मात्र तो १९ व्या षटकात बाद झाला. शेवटच्या षटकात अनुज रावत बंगळुरूला विजय मिळवून देऊ शकला नाही.

पॉवरप्लेमध्ये हैदराबाद एकही विकेट घेऊ शकला नाही. मात्र मयांकने कोहलीची व नंतर पॅट कमिन्सची विकेट घेतली.
ट्रॅव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा या सलामीच्या जोडीला पॉवरप्लेमध्ये आक्रमणासाठी संधी देण्यात आली. त्याचा त्यांनी पुरेपूर फायदा घेतला. अभिषेक बाद झाला, मात्र हेडने शतक केले. अब्दुल समादने टॉप्लीने टाकलेल्या १९व्या शटकांत दोन षटकार आणि तीन चौकारासंह २५ धावा वसूल केल्या. त्यामुळेच हैदराबादने आयपीएलमधील सर्वाधिक धावांचा आपलाच विक्रम मोडला.

हे ही वाचा:

‘निवडणूक रोखे मागे घेतल्याने प्रत्येकाला पश्चात्ताप होईल’

सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार करणाऱ्यांना गुजरातमधून अटक

मीरारोडमध्ये हिंदुत्ववादी संघटनांचा संताप; चिकन दुकानदाराने ४ वर्षांच्या मुलीवर केला अत्याचार

जातीचा खुुळखुळा, करी देश खिळखिळा!

हैदराबादने बेंगळुरूला १५ चौकार आणि २२ षटकार लगावले. हेडने अभिषेक शर्मासह ४९ चेंडूंत १०८ धावांची भागीदारी केली, त्यानंतर क्लासेनेसह ५७ धावा २५ चेंडूंतच केल्या. क्लासेन-मार्करॅमची ६६ धावांची भागीदारी २७ चेंडूंतच झाली. त्यानंतरच्या तीन षटकांतच मार्करॅम-समादने ५६ धावा सहज जोडल्या होत्या.

Exit mobile version