टी-२० वर्ल्डमध्ये टीम इंडियासाठी फिनिशरची भूमिका कोण बजावणार? तो रिंकू सिंग असेल की हार्दिक पांड्या की दिनेश कार्तिक? आयपीएलच्या या मोसमातील आतापर्यंतच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास दिनेश कार्तिक या शर्यतीत आघाडीवर आहे. सनरायझर्स हैदराबादविरुद्ध दिनेश कार्तिकने ३५ चेंडूत ८३ धावांची तुफानी खेळी केली. कार्तिकने आपल्या झंझावाती खेळीत ५ चौकार आणि ७ षटकार मारले. यापूर्वी दिनेश कार्तिकने आपल्या स्फोटक फलंदाजीच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला पंजाब किंग्जविरुद्ध विजय मिळवून दिला होता. दिनेश कार्तिकने पंजाब किंग्जविरुद्ध १० चेंडूत २८ धावांची खेळी केली.
या मोसमात आतापर्यंत दिनेश कार्तिकने ६ डावात २०४.४५ च्या स्ट्राईक रेटने २२६ धावा केल्या आहेत. त्याचवेळी, आतापर्यंत रिंकू सिंग आणि हार्दिक पंड्या आपली छाप पाडू शकलेले नाहीत. हार्दिक पंड्याने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध ६ चेंडूत २१ धावांची एकमेव खेळी केली होती. मात्र तो संघाविरुद्ध अपयशी ठरला आहे. खासकरून, दिनेश कार्तिक ज्या प्रकारे शेवटच्या षटकांमध्ये सहज चौकार आणि षटकार मारत आहे. ते पाहता दिनेश कार्तिकचा टी-२० विश्वचषक संघात फिनिशर म्हणून समावेश केला जाऊ शकतो, असे मानले जात आहे.
हेही वाचा :
दिनेश कार्तिकच्या ८३ धावा ठरल्या अपुऱ्या
हार्दिक पंड्याचे वर्ल्ड कप तिकीट कापणार?
ग्लेन मॅक्सवेलने घेतला आयपीएलमधून ब्रेक
दिनेश कार्तिकची टी-20 कारकीर्द
दिनेश कार्तिकच्या टी-२० कारकिर्दीवर नजर टाकली तर त्याने भारतासाठी ६० सामने खेळलेआहेत. ज्यामध्ये या यष्टीरक्षक फलंदाजाने २६.३८ च्या सरासरीने आणि १४२.६२ च्या स्ट्राईक रेटने ६८६ धावा केल्या आहेत. दिनेश कार्तिकने भारतासाठी टी-२० सामन्यात एकदाच पन्नास धावांचा टप्पा ओलांडला आहे. याशिवाय आयपीएलच्या २४९ सामन्यांमध्ये दिनेश कार्तिकच्या नावावर १३४.९८ च्या स्ट्राईक रेट आणि २६.६४ च्या सरासरीने ४७४२ धावा आहेत. दिनेश कार्तिकने आयपीएल सामन्यांमध्ये २२ वेळा पन्नास धावांचा टप्पा ओलांडला आहे. तर या लीगमधील सर्वोच्च धावसंख्या ९७ धावांची आहे.