दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या डॉ. सुश्रुत घैसास यांचा राजीनामा!

रुग्णालय प्रमुखांकडे राजीनामा सुपूर्द 

दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या डॉ. सुश्रुत घैसास यांचा राजीनामा!

पुण्यातील दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमधील वरिष्ठ डॉक्टर डॉ. सुश्रुत घैसास यांनी आपला पदाचा राजीनामा दिला आहे. रुग्णालयाने उपचारासाठी केलेल्या मागणीची रक्कम भरू न शकल्याने तनिषा भिसे या गर्भवती महिलेचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर राज्यभरातून संताप व्यक्त करत संबंधित डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी केली जात होती. भाजपा, शिवसेना शिंदे, उबाठा आणि पतित पावन अशा संघटनांकडून रुग्णालयाबाहेर निदर्शने करण्यात आली होती. अखेर या वादादरम्यान डॉ. सुश्रुत घैसास यांनी आपला पदाचा राजीनामा दिला आहे.

डॉ. सुश्रुत घैसास यांच्यावर तनिषा भिसे यांच्या उपचाराकरिता १० लाख रुपयांची मागणी केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी चौकशी करीता समिती गठीत करण्यात आली आहे. डॉ. सुश्रुत घैसास यांनी रुग्णालयाचे प्रमुख डॉ. धनंजय केळकर यांच्याकडे आपला राजीनामा सुपूर्द केला आहे.

डॉ. सुश्रुत घैसास यांनी राजीनाम्याच्या पत्रात नमूद केले आहे की, या संपूर्ण प्रकरणामुळे रुग्णालयाच्या नावलौकिकावर गालबोट लागत असून, माझ्या उपस्थितीमुळे परिस्थिती अधिक बिघडण्याची शक्यता आहे. त्यामुळे मी स्वेच्छेने राजीनामा देत आहे. रुग्णसेवा हे माझे सर्वोच्च कर्तव्य असून, त्यात कोणतीही अडचण निर्माण होऊ नये, हीच माझी भूमिका आहे.

हे ही वाचा : 

मुलीला रस्त्यात छेडले, कर्नाटकचे गृहमंत्री म्हणतात, अशा घटना घडत असतात!

चूक दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचीच, अहवालातून आले समोर

लातूरमधील अनेक कुटुंबांचे नशीब बदलले

“मला तुरुंगवासही होऊ शकतो” ममता बॅनर्जी असं का म्हणाल्या?

दरम्यान, या प्रकरणाच्या तपासणीकरिता चौकशी समिती गठीत करण्यात आली आहे. चौकशी सुरु आहे. लवकरच खरी माहिती समोर येईल. मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे हे दोषी असेल त्याच्यावर कारवाई होईल. यासंदर्भात एक उच्चस्तरीय समिती नेमण्यात आली आहे, जी संपूर्ण घटनेचा तपास करेल. तसेच अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडू नयेत म्हणून धर्मादाय रुग्णालयांवर कशाप्रकारे नियंत्रण करता येईल याबाबत ही समिती काम करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते.

 

निसर्गाची कुशी, मनाची विश्रांती ! | Sudarshan Surve | Diveagar | Kokan |

Exit mobile version