माजी केंद्रीय मंत्री आणि पटणा साहिबचे खासदार रविशंकर प्रसाद यांनी बिहार विधानसभेतील विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांच्या वक्फ सुधारणा विधेयकावर दिलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना शायरीच्या माध्यमातून टोला लगावला. पत्रकारांनी रविशंकर प्रसाद यांना तेजस्वी यादव यांच्या “बिहारमध्ये वक्फ सुधारणा लागू होऊ देणार नाही” या विधानाबाबत विचारले असता त्यांनी आपल्या खास शैलीत उत्तर दिलं, “त्यांची सरकार येणार आहे का? दिल बहलाने के लिए ग़ालिब ये ख्याल अच्छा है।”
तेजस्वी यादव यांनी शनिवारी म्हटलं होतं की, वक्फ सुधारणा विधेयकाच्या विरोधात राष्ट्रीय जनता दलाने संसदेत (लोकसभा आणि राज्यसभा) ठामपणे आपली भूमिका मांडली आणि कठोर विरोध करताना मतदानही केलं. त्यांनी पुढे म्हटलं की, “जे लोक मुसलमानांचे हितचिंतक असल्याचा दिखावा करतात, त्यांचं खोटं उघड झालं आहे. बिहारमध्ये आमची सरकार आली तर हे विधेयक कधीही लागू होऊ देणार नाही, ते थेट कचरापेटीत टाकू.”
हेही वाचा..
विविध गटांकडून ‘ब्राह्मणां’ना केले जाते आहे लक्ष्य…माधव भांडारी यांचा जुना व्हीडिओ व्हायरल
मुलं चोरीच्या अफवेमुळे काय घडलं ?
सत्ता गेली; आता ‘आप’ नेते बनले चक्क युट्युबर!
ममता बॅनर्जी यांच्या हिंदूंवरील अत्याचाराविरोधात अग्निमित्रा पॉल काय म्हणाल्या…
दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या बिहार दौऱ्यावरही रविशंकर प्रसाद यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. त्यांनी म्हटलं, “वक्फ विधेयकावर लोकसभेत भरपूर चर्चा झाली, पण राहुल गांधी गप्प होते. ते काही बोलले नाहीत, त्यांची बहिणही दिसली नाही. रविशंकर प्रसाद म्हणाले, “राहुल गांधींना बिहारमध्ये येण्याचा अधिकार आहे, येऊ द्या. पण बिहारची जनता त्यांच्या सोबत नाही.
राहुल गांधी सोमवारी बिहारच्या दौऱ्यावर पटणाला येणार आहेत. ते तीन कार्यक्रमांमध्ये सहभागी होतील. सर्वप्रथम बेगूसरायमध्ये ‘पलायन रोको, नौकरी दो’ यात्रा मध्ये सहभागी होतील, त्यानंतर पटणामध्ये संविधान संमेलनात भाग घेतील आणि शेवटी पक्षाच्या एका बैठकीला उपस्थित राहतील.