बॉक्स ऑफिसवरच्या भरघोस यशानंतर दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ‘पावनखिंड’ चित्रपट आता ओटीटीवर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. फर्जंद, फत्तेशिकस्तनंतर दिग्पाल यांच्या शिवराज अष्टकातील हा तिसरा चित्रपट होता. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या कोणत्या पराक्रमाची कथा चित्रपटाच्या रुपात येईल, याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये निर्माण झाली होती. मात्र, प्रेक्षकांसाठी आनंदाची बातमी असून लवकरच नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
शिवजयंतीच्या मुहूर्तावर या चौथ्या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. ‘शेर शिवराज’ असे या चित्रपटाचे नाव आहे. प्रतापगडाच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा वध केल्याची घटना इतिहासात अत्यंत महत्त्वाची आहे. याच घटनेची गोष्ट या चित्रपटात पहायला मिळणार आहे.
‘आदिलशाहीच्या जुलमी वरवंट्याखाली जेव्हा महाराष्ट्र भरडला, अन्याय निवारण्यासाठी तेव्हा कणाकणांतून बाहेर पडला सहस्त्र हातांचा अजस्त्र नरसिंह,’ असं लिहित दिग्दर्शक दिग्पाल आणि अभिनेता चिन्मय मांडलेकर यांनी हा टीझर सोशल मीडियावर शेअर केला आहे. शिवचरित्रातील ‘अफझलखान वध’ या शिवकालीन इतिहासाचा महत्त्वाचा अध्याय आहे.
हे ही वाचा:
‘आम्ही म्हणायचे ठाकरे सरकार, मात्र लाभ घेते पवार सरकार’
काश्मीर फाईल्सच्या टीमने घेतली योगी आदित्यनाथ यांची भेट
पंतप्रधान मोदींची जपानच्या पंतप्रधानांना ‘कृष्ण पंखी’ भेट
या ४५ मिनिटांच्या टीझरची सुरुवातच अफजलखानापासून होते. मात्र ही भूमिका कोणी साकारली, हे स्पष्ट दिसत नाही. अभिनेता चिन्मय मांडलेकर हा पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसत आहे. या टीझरने चित्रपटाविषयीची उत्सुकता आणखी वाढवली आहे. येत्या २२ एप्रिल रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.