लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला महाराष्ट्रातील मान्यवर राहणार उपस्थित

यंदाच्या स्वातंत्र्यदिनाची संकल्पना आहे ‘विकसित भारत’

लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला महाराष्ट्रातील मान्यवर राहणार उपस्थित

भारत देश १५ ऑगस्ट २०२४ रोजी आपला ७८ वा स्वातंत्र्यदिन साजरा करणार आहे. यासाठी देशभरात उत्साह असताना नवी दिल्लीत यानिमित्ताने होणाऱ्या कार्यक्रमाची जोरदार तयारी सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लाल किल्ल्यावर राष्ट्रध्वज फडकवतील आणि त्यानंतर या ऐतिहासिक स्मारकावरून साऱ्या देशाला संबोधित करतील. यंदाच्या स्वातंत्र्यदिनाची संकल्पना आहे ‘विकसित भारत’.

दरवर्षीप्रमाणे यंदाही दिल्लीत भव्य असा कार्यक्रम पार पडणार असून स्वातंत्र्यदिनाच्या समारंभाला उपस्थित राहण्यासाठी सरकारने देशभरातील विशेष पाहुण्यांना आमंत्रित केले आहे. विशेष म्हणजे यामध्ये महाराष्ट्रातील १२३ मान्यवर व्यक्तींचा देखील समावेश आहे. यामध्ये समाजाच्या विविध स्तरांमधील व्यक्तींचा समावेश असून, यामध्ये महिला, युवा, शेतकरी, आदिवासी समाजाच्या व्यक्ती, विविध क्षेत्रांमधील अधिकारी, सरकारच्या विविध योजनांचे लाभार्थी, MyGov स्वातंत्र्य दिन प्रश्नमंजुषा स्पर्धेचे विजेते आणि नीती आयोगाच्या विशेष निमंत्रितांसह विविध क्षेत्रांमधील मान्यवरांचा समावेश आहे.

नवी दिल्लीत जिथे पंतप्रधान नरेंद्र मोदी ऐतिहासिक लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करणार आहेत, तिथे सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. महाविद्यालयांपासून शाळा आणि संस्थांपर्यंत सर्वत्र जोरदार तयारी सुरू आहे आणि सर्वजण त्यांच्या परेडच्या कार्यक्रमासाठी, देशभक्तीपर कार्यक्रम आणि ध्वजारोहण समारंभासाठी सज्ज आहेत.

हे ही वाचा..

आशा पारेख यांना स्व. राज कपूर जीवन गौरव पुरस्कार

ट्रेनच्या डब्यात नमाज अदासाठी तयारीचा व्हिडीओ व्हायरल

सचिन, धोनीनंतर पीआर श्रीजेशच्या जर्सीला मिळाला मान, १६ क्रमांकाची जर्सी निवृत्त !

अतीक अहमदच्या मुलाचा एनकाउंटर करणाऱ्या एसटीएफ टीमला ‘राष्ट्रपती शौर्य पदक’

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील लाडसावंगी येथील आणखी एक शिक्षक, सारिका जैन म्हणाल्या की, “दरवर्षी आम्ही शाळेत ध्वजारोहण सोहळा साजरा करतो. पण यंदा लाल किल्ल्यावर पंतप्रधानांबरोबर साजरा करणार आहोत. हा सन्मान दिल्याबद्दल कृतज्ञ आहे.” तसेच अत्यंत उत्साह वाटत आहे की आमच्या सारख्या दूरवरच्या खेड्यातील लोकांनी दिल्ली केवळ टीव्ही वर बघितली आहे. पण, आता दिल्लीत येऊन पंतप्रधानांना आपला राष्ट्रध्वज फडकावताना बघायला मिळेल, ही भाग्याची गोष्ट आहे.

Exit mobile version