यूनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) द्वारे डिजिटल पेमेंट सेवा शनिवारी बहुतांश यूजर्ससाठी पूर्ववत सुरू झाली आहे आणि पूर्वीप्रमाणेच काम करू लागली आहे. यापूर्वी या सेवेमध्ये अचानक अडथळे आले होते, ज्यामुळे संपूर्ण देशभरात अनेक यूपीआय यूजर्सना अडचणींचा सामना करावा लागला. जरी भारतीय राष्ट्रीय पेमेंट कॉर्पोरेशन (NPCI) कडून अद्याप सेवा पूर्ववत झाल्याची अधिकृत पुष्टी झालेली नाही, तरी दिल्ली-एनसीआर परिसरातील यूजर्सनी स्मार्टफोन अॅपद्वारे यशस्वी डिजिटल व्यवहार झाल्याची माहिती दिली आहे. दुपारी, देशातील अनेक ऑनलाइन पेमेंट प्लॅटफॉर्मवर सेवा खंडित झाली होती, ज्यामुळे खरेदी, बिल भरणे आणि व्यवसायिक व्यवहारात अडचणी आल्या.
डाउन डिटेक्टर या आउटेज ट्रॅकिंग प्लॅटफॉर्मनुसार, दुपारी १ वाजेपर्यंत २,३५८ तक्रारी नोंदवण्यात आल्या. त्यामध्ये ८१ टक्के तक्रारी पेमेंट अडथळ्यांशी संबंधित होत्या, तर १७ टक्के तक्रारी फंड ट्रान्सफरशी संबंधित होत्या. NPCI ने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ वर पोस्ट करत ‘तांत्रिक अडचणी’ असल्याचे सांगितले. त्यांनी यूपीआय व्यवहारात अडथळ्यांची माहिती दिली होती. NPCI ने म्हटले होते, “आम्ही या समस्येवर काम करत आहोत आणि तुम्हाला वेळोवेळी माहिती देत राहू. यामुळे झालेल्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत.”
हेही वाचा..
सुखबीर सिंग बादल पुन्हा शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष
सैफवर हल्ला होताना पाहून करीना किंचाळली!
आयपीलच्या इतिहासातील सर्वात मोठा पराभव
यूपीआय सेवा अडथळ्यामुळे SBI, ICICI आणि HDFC यांसारख्या प्रमुख बँकांचे अॅप्सही प्रभावित झाले. भारतामध्ये यूपीआय व्यवहार खूप लोकप्रिय झाले आहेत. दर महिन्याला यूपीआय व्यवहारांची नोंद नवीन उच्चांक गाठते. NPCI च्या ताज्या आकडेवारीनुसार, मार्च महिन्यात यूपीआयने १८.३ अब्ज व्यवहारांची नोंद केली, तर फेब्रुवारीमध्ये ही संख्या १६.११ अब्ज होती. मासिक आधारावर १३.५९ टक्क्यांनी वाढ झाली.
मार्चमध्ये यूपीआय व्यवहारांचे एकूण मूल्य २४.७७ लाख कोटी रुपये होते, जे फेब्रुवारीतील २१.९६ लाख कोटींपेक्षा १२.७९ टक्के अधिक आहे. वार्षिक तुलनेत, मार्च महिन्यातील या रेकॉर्डब्रेकिंग यूपीआय व्यवहारांनी मूल्यात २५ टक्के आणि संख्येने ३६ टक्के वाढ दाखवली आहे.