दूरसंचार मंत्रालयाने १ जानेवारी २०२४ पासून नव्या मोबाईल कनेक्शन खरेदीचे नियम बदलले असून अधिक कठोर केले आहेत. नव्या नियमावलीमुळे ग्राहकांना नवं सिमकार्ड घेणं अधिक सोपं झालं आहे. देशात डिजिटलायझेशनला चालना मिळावी यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे दूरसंचार विभागाने सांगितले आहे.
ग्राहकांना नवं सिम कार्ड मिळविण्यासाठी पेपर बेस्ड केवाईसीवर पूर्ण बंदी असेल. त्यामुळे आता नवं सिम कार्ड घेण्यासाठी ग्राहकांना फक्त डिजिटल किंवा ई-केवायसी (e-KYC) सबमिट करावं लागणार आहे. दळणवळण मंत्रालयाच्या दूरसंचार विभागाने मंगळवार, ५ डिसेंबर रोजी एक अधिसूचना जारी करून नव्या नियमांबाबत माहिती दिली आहे.
नवीन वर्षापासून म्हणजेच, १ जानेवारी २०२४ पासून सिम कार्ड खरेदीच्या नियमांमध्ये मोठे बदल होणार आहेत. आता कोणत्याही ग्राहकाला सिमकार्ड मिळविण्यासाठी ई-केवायसी करणं आवश्यक असेल आणि आता कागदावर आधारित केवायसी पूर्णपणे बंद होईल, असं अधिसूचनेत म्हटलं आहे. याशिवाय नवीन मोबाईल कनेक्शन घेण्याचे उर्वरित नियम तसेच राहणार असून त्यात कोणताही बदल करण्यात आलेला नाही, असंही अधिसूचनेतून सांगण्यात आलं आहे. सिम कार्ड मिळविण्यासाठी, ई-केवायसी सोबत पेपर आधारित केवायसी करू शकता, परंतु आता १ जानेवारीपासून ते पूर्णपणे बंद केलं जाईल.
हे ही वाचा:
१३ डिसेंबरपर्यंत संसदेवर हल्ला करण्याची खलिस्तानी दहशतवादी पन्नुची भारताला धमकी
खलिस्तानी दहशतवादी लखबीर सिंग रोडेच्या मृत्यूनंतर त्याचा साथीदार परमजीत सिंग उर्फ धाडीला अटक!
उद्धव ठाकरे म्हणतात, लोकसभा निवडणूक बॅलेट पेपरवर घ्या…
राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे अध्यक्ष सुखदेव सिंह गोगामेडी यांना गोळ्या घातल्या
याआधी दूरसंचार मंत्रालयाने सिमकार्डशी संबंधित आणखी एक नियम बदलला आहे. नियमांमध्ये बदल करून केंद्र सरकारनं १ डिसेंबरपासून एका आयडीवर मर्यादित सिम जारी करण्याचा नियम लागू केला आहे. सिमकार्ड मिळवण्यापूर्वी केवायसी प्रक्रिया पूर्ण करणं आवश्यक असून आता सिम खरेदी करणाऱ्यांसोबतच सिम विक्रेत्याचीही नोंदणी केली जाणार आहे. जर एखाद्या व्यक्तीनं एकाच वेळी अनेक सिमकार्ड खरेदी केली, तर तो केवळ व्यावसायिक कनेक्शनद्वारेच सिम कार्ड खरेदी करू शकणार आहे.