33 C
Mumbai
Sunday, October 27, 2024
घरविशेष'पहिल्यांदाच डिजिटल अटकेचा उल्लेख, फसवणूक टाळण्यासाठी पंतप्रधानांनी सांगितले तीन उपाय'

‘पहिल्यांदाच डिजिटल अटकेचा उल्लेख, फसवणूक टाळण्यासाठी पंतप्रधानांनी सांगितले तीन उपाय’

मन की बातचा ११५ वा भाग पार

Google News Follow

Related

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (२७ ऑक्टोबर) मन की बात कार्यक्रमातून जनतेला संबोधित केले. पंतप्रधान मोदींच्या मन की बात कार्यक्रमाचा हा ११५ वा भाग होता. सर्वप्रथम, पंतप्रधान मोदींनी सरदार पटेल आणि भगवान बिरसा मुंडा यांचे स्मरण केले. यानंतर त्यांनी भारतात गेमिंग स्पेसचा वेगवान विस्तार, मेड इन इंडिया आणि ॲनिमेशन याविषयी अनेक गोष्टी सांगितल्या. पंतप्रधान मोदींनी धोकादायक डिजिटल अटकेवरही प्रकाश टाकला आणि ती फसवणूक टाळण्यासाठी तीन स्टेप सांगितल्या.

डिजिटल अटकेसारखी फसवणूक टाळण्यासाठी तीन पायऱ्या सांगताना पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘कॉल येताच ‘थांबा’, घाबरू नका, शांत राहा, घाईघाईने पाऊल उचलू नका, तुमची वैयक्तिक माहिती कोणालाही देऊ नका. स्क्रीन शॉट्स घ्या आणि रेकॉर्डिंग करा.

दुसरी पायरी म्हणजे ‘विचार करा’, कोणतीही सरकारी एजन्सी फोनवर धमकावत नाही, व्हिडिओ कॉलवर चौकशी करत नाही किंवा पैसे मागत नाही. तसे असेल तर समजून घ्या की, काहीतरी चूक आहे. यानंतर तिसरी पायरी ‘टेक ॲक्शन’ फॉलो करा. नॅशनल सायबर हेल्पलाइन १९३० डायल करा, या अशा तीन पायऱ्या पंतप्रधान मोदींनी सांगितल्या.

पंतप्रधान मोदींनी जनतेला संबोधताना आत्मनिर्भरचा उल्लेख केला. पंतप्रधान मोदी म्हणाले, आत्मनिर्भर हे केवळ आमचे धोरणच नाही तर आमची आवड देखील बनली आहे. आत्मनिर्भर भारत अभियान एक व्यापक अभियान बनत आहे. आम्ही प्रत्येक क्षेत्रात यश मिळवत आहोत. या महिन्यात, आम्ही लडाखमधील हॅनले येथे आशियातील सर्वात मोठ्या ‘इमेजिंग टेलिस्कोप MACE’ चे उद्घाटन केले. ते ४३०० मीटर उंचीवर आहे. याचे खास वैशिष्ट्य म्हणजे, हे मेड इन इंडिया आहे.

सरदार पटेल आणि भगवान बिरसा मुंडा यांचे स्मरण करून पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, भारताने प्रत्येक युगात काही आव्हानांचा सामना केला आहे. आज मन की बात मध्ये मी अशा दोन महान वीरांची चर्चा करणार आहे ज्यांच्याकडे धैर्य आणि दूरदृष्टी होती. देशाने त्यांची १५० वी जयंती साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे. ३१ ऑक्टोबरपासून सरदार पटेल यांचे १५० वे जयंती वर्ष सुरू होणार आहे. यानंतर १५ नोव्हेंबरपासून भगवान बिरसा मुंडा यांचे १५० वे जयंती वर्ष सुरू होणार आहे. या दोन महापुरुषांनी वेगवेगळी आव्हाने पेलली, पण त्यांची दृष्टी एकच होती, ‘देशाची एकता’.

हे ही वाचा : 

‘देवेंद्र फडणवीस राजकीय विरोधक, पण वैयक्तिक शत्रू नाहीत’

वक्फ बोर्डाने शेतकऱ्यांच्या १२०० एकर जमिनीवर ठोकला दावा, शेतकरी म्हणाले, आम्ही जायचे कुठे?

पंजाबच्या रेचेल गुप्ताने ‘मिस ग्रँड इंटरनॅशनल २०२४’ चा जिंकला ‘ताज’

वयाच्या ६ व्या वर्षी घडला गुन्हा, १७ वर्षाची झाल्यावर केली तक्रार ,४ तासात मौलवीला केले गजाआड!

पंतप्रधान मोदींनी ‘व्होकल फॉर लोकल’चाही उल्लेख केला. ते म्हणाले, या सणासुदीच्या काळात आपण सर्वजण आत्मनिर्भर भारताच्या या मोहिमेला बळकट करू. आपण ‘व्होकल फॉर लोकल’ या मंत्राने खरेदी करतो. हा नवा भारत आहे जिथे, ‘मेक इन इंडिया’, ‘मेक फॉर द वर्ल्ड बनला आहे’. आपल्याला केवळ भारताला आत्मनिर्भर बनवायचे नाही तर आपल्या देशाला नवनिर्मितीचे जागतिक पॉवरहाऊस म्हणून स्थापित करायचे आहे.

भारत ॲनिमेशनच्या क्षेत्रात जगामध्ये क्रांती घडवण्याच्या मार्गावर असल्याचे पंतप्रधान मोदींनी सांगितले. ते म्हणाले, आज ॲनिमेशन क्षेत्र हा असा उद्योग बनला आहे की तो इतर उद्योगांना बळ देत आहे. आजकाल व्हीआर पर्यटन खूप लोकप्रिय होत आहे. व्हर्च्युअल टूरद्वारे अजिंठा लेणी पाहता येतात. कोणार्क मंदिराच्या कॉरिडॉरमधून फेरफटका मारा किंवा वाराणसीच्या घाटांचा आनंद घ्या. पर्यटन स्थळाची व्हीआर टूर लोकांच्या मनात कुतूहल निर्माण करते. आज या क्षेत्रात ॲनिमेटर्स, स्टोरी टेलर, लेखक, व्हॉईस ओव्हर एक्सपर्ट, संगीतकार आणि गेम डेव्हलपर यांची मागणी वाढत आहे.

छोटा भीमप्रमाणेच इतर ॲनिमेटेड मालिका कृष्णा, मोटू-पतलू, बाल हनुमान यांचेही जगभरात चाहते आहेत. भारतीय ॲनिमेटेड पात्रे आणि चित्रपट त्यांच्या आशय आणि क्रिएटिविटीमुळे जगभरात पसंत केले जात आहेत. भारत ॲनिमेशनच्या क्षेत्रात क्रांती घडवण्याच्या मार्गावर आहे. भारतातील गेमिंग स्पेसही वेगाने वाढत आहे. भारतीय खेळही जगभर प्रसिद्ध होत आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
185,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा