29 C
Mumbai
Saturday, January 4, 2025
घरविशेषनव्या सहा विमानतळांवर डिजी यात्राची सुविधा मिळणार

नव्या सहा विमानतळांवर डिजी यात्राची सुविधा मिळणार

डिजी यात्रा-सक्षम विमानतळांची एकूण संख्या तेरा होणार

Google News Follow

Related

ऑगस्ट २०२३ मध्ये मुंबई, अहमदाबाद, कोची, लखनौ, जयपूर आणि गुवाहाटी या सहा विमानतळांवर डिजी यात्रा सुविधा सुरू केली जाणार आहे. या विमानतळांवर डिजी यात्रा पायाभूत सुविधांची अंमलबजावणी आणि स्थापना टप्प्याटप्प्याने केली जाईल.

नागरी विमान वाहतूक आणि पोलाद मंत्री ज्योतिरादित्य यांच्या हस्ते १ डिसेंबर २०२२ रोजी, नवी दिल्ली, वाराणसी आणि बेंगळुरू या तीन विमानतळांवर, डिजी यात्रा सुविधेचा प्रारंभ झाला. त्यानंतर आणखी चार विमानतळांवर, विजयवाडा, पुणे, हैदराबाद आणि कोलकाता येथे ही सुविधा लागू करण्यात आली. त्यामुळे डिजी यात्रा विमानतळांची संख्या सात झाली होती. आता नव्याने उपरोक्त सहा विमानतळांच्या समावेशासह, डिजी यात्रा-सक्षम विमानतळांची एकूण संख्या तेरा होणार आहे. डिजी यात्रा सुविधेचा १० ऑगस्ट २०२३ पर्यंत ३४ लाख ६० हजार ४५४ हवाई प्रवाशांनी वापर केला आहे. त्याच तारखेपर्यंत, डिजी यात्रा मोबाईल ऍप्लिकेशन वापरकर्त्यांची संख्या १.२९ दशलक्ष होती.

डिजी यात्रा सुविधा काय आहे? 

डिजी यात्रा सुविधा ही एफआरटी म्हणजेच ‘फेशियल रिकग्निशन टेक्नॉलॉजी’ वर आधारित सुविधा आहे. विमानतळांवर प्रवाशांबरोबर संपर्करहित, निर्बाध प्रक्रिया साध्य करण्यासाठी संकल्पित मोबाईल ऍप्लिकेशन-आधारित सुविधा आहे. याद्वारे प्रवाशांना त्यांची ओळख आणि प्रवास तपशील सत्यापित करण्यासाठी त्या व्यक्तीच्या चेहऱ्याच्या वैशिष्ट्यांचा वापर करून कागदविरहीत आणि कोणत्याही प्रकारे संपर्करहीत प्रक्रियेद्वारे विमानतळावरील विविध तपास स्थानांमधून जाण्यास मदत होते.

डिजी यात्रा प्रक्रियेत, प्रवाशांच्या वैयक्तिकरित्या ओळखण्यायोग्य माहिती (पीआयआय) डेटाचे कोणत्याही प्रकारे केंद्रीय संचयन केले जात नाही. प्रवाशांचा सर्व डेटा त्यांच्या स्मार्टफोनच्या वॉलेटमध्ये एनक्रिप्टेड आणि संग्रहित केला जातो.

हे ही वाचा:

सातारा जिल्ह्याच्या विकासासाठी बांबू लागवड आणि पर्यटनाला चालना देणार

श्रीनगर एअरबेसवर मिग- २९ लढाऊ विमानांचा स्क्वॉड्रन तैनात

जया प्रदा यांना सहा महिन्यांचा तुरुंगवास, पाच हजारांचा दंड; काय आहे प्रकरण?

भारताची जपानवर ५-० ने मात

तसेच माहिती फक्त प्रवासी आणि ती व्यक्ती प्रवास करीत असलेल्या मूळ विमानतळावर त्यासंबंधित स्थान यांच्यामध्येच सामायिक केली जाते. यासाठी प्रवाशाला डिजी यात्रा आयडी प्रमाणित करणे आवश्यक आहे. उड्डाणानंतर २४ तासांच्या आत विमानतळाच्या सिस्टममधून डेटा काढून टाकला जातो. प्रवासी जेव्हा प्रवास करतात तेव्हाच आणि केवळ मूळ विमानतळावर डेटा थेट सामायिक केला जातो.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
219,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा