अखेर दिघा रेल्वे स्थानकाच्या उद्घाटनाचा मुहूर्त अखेर ठरला आहे.गेल्या अनेक महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या दिघा रेल्वे स्थानकाचे उद्घाटन उद्या १२ जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे.तसेच उरण रेल्व मार्गिकेचे उद्घाटन देखील मोदींच्या हस्तेच केले जाणार आहे.एबीपी माझाने दिलेल्या बातमीनुसार,आज ११ जानेवारी अधिकृत कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे.दिघा रेल्वे स्थानकावरून ठाण्याचे खासदार राजन विचारे यांनी आंदोलन केले होते त्यानंतर आदित्य ठाकरे यांनी देखील हा मुद्दा उचलून टीका केली होती.
उद्या पंतप्रधान मोदी नवी मुंबईत असणार आहेत.त्यावेळी नवी मुंबईतील अनेक प्रकल्पांचे लोकार्पण पंतप्रधान मोदींच्या हस्ते पार पडणार आहे.त्यापैकी सर्वात महत्वाचे दिघा गाव रेल्वे स्थानकाचे लोकार्पण असणारा आहे.तसेच खारकोपर ते उरण रेल्वे लाईन गेल्या नऊ ते दहा महिन्यांपासून तयार आहे.त्या रेल्वे मार्गिकेचे उदघाटन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते पार पडणार आहे.याचा फायदा नवी मुंबईकरांना होणार आहे.उरण वरून सिएसएमटीला येण्यासाठी प्रवाशांचे अत्यंत हाल व्हायचे.जेव्हा उरण वरून रेल्वे सुरु होईल तेव्हा तेथून नेरुळ, बेलापूर वरून हार्बर लाईनवर येता येईल आणि हार्बर लाईन वरून थेट मुंबईला येता येणार आहे.त्यामुळे मुंबईत येण्यासाठी प्रवाशांच्या वेळेत बचत होणार आहे.
हे ही वाचा:
मी पुन्हा सांगतो, हे सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल!
‘ज्युनियर मुंबई श्री’चा मान मिळाला प्रणव खातूला
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोककल्याणाचे काम केले
ठाणे ते ऐरोली स्थानकांदरम्यान दिघा हे स्थानक उभारण्यात आले आहे. दिघा परिसरात मोठी लोकवस्ती असून, तिथं आयटी कंपन्याही आल्या आहेत. पण या स्थानकावर आजवर ट्रेन थांबत नव्हती. त्यामुळे रहिवाशी आणि नोकरदारांना ठाण्याला येण्यासाठी रिक्षा किंवा बसचा वापर करावा लागत होता. तसेच दिघा एमआयडीसीमध्ये येणाऱ्या कामगार वर्गाला ऐरोली स्थानकात उतरावे लागत होते.मात्र, आता हा मार्ग सुरु झाल्यानंतर कामगारांचा वेळ वाचून प्रवास अधिक सुखकर होणार आहे.दिघा रेल्वे स्थानकासाठी ४२८ कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे.
पंतप्रधान मोदींच्या या प्रकल्पांचे उदघाटन
ठाणे-वाशी ट्रान्सहार्बर मार्गावरील दिघा रेल्वे स्थानकाचे उदघाटन
मारिन ड्राईव्ह ऑरेंज गेट साडेसहा किमीच्या बोगद्याचे भूमिपूजन
बेलापूर-पेंधर नवी मुंबई मेट्रो- १ च्या प्रकल्पाचे औपचारिक उदघाटन
सीवूडस-बेलापूर उरण उपनगरीय रेल्वेसेवेच्या चौथ्या मार्गिकेचे उदघाटन
पश्चिम रेल्वेच्या सहाव्या मार्गिकेचे उदघाटन
बोरिवली-ठाणे भूमिगत मार्गाचं भूमिपूजन
शिवडी न्हावा शेवा अटल सेतूचे लोकार्पण, यासह अनेक प्रकल्पनाचे उद्या पंतप्रधान मोदींच्या हस्ते पार पडणार आहे.