27 C
Mumbai
Saturday, November 16, 2024
घरविशेषचांगली बातमी... आता ठाण्यात गाडी बदलू नका, थेट ट्रान्सहार्बरवर प्रवास करा!

चांगली बातमी… आता ठाण्यात गाडी बदलू नका, थेट ट्रान्सहार्बरवर प्रवास करा!

संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यावर उद्घाटन होण्याची शक्यता

Google News Follow

Related

ठाण्यात लोकल गाड्या न बदलता थेट नवी मुंबई ट्रान्सहार्बर लाईनवर प्रवास करणे आता शक्य होणार आहे. ट्रान्स हार्बर मार्गावर उभारण्यात आलेले दिघा रेल्वे स्थानक लवकरच सुरु होणार आहे. दिघा रेल्वे स्थानक ६ एप्रिलनंतर सुरु होण्याचे संकेत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिले आहेत.

दिघा रेल्वेस्थानक बांधून पूर्ण झाले आहे. त्यामुळे हे स्थानक प्रवाशांसाठी लवकरत लवकर खुले करावे अशी मागणी माजी खासदार संजीव नाईक यांनी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची भेट घेऊन केली आहे. संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यावर लवकरच दिघा स्थानकाचे उद्घाटन करण्याची शक्यता मंत्री रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केली आहे.

मध्य आणि हार्बर मार्गाला जोडणार्‍या दिघा रेल्वे स्थानकाची घोषणा २०१४ साली झाली होती. या स्थानकासाठी ४२८ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. तसेच २०१६ साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिघा रेल्वे स्थानकाचे भूमीपूजन झाले होते. प्रत्यक्षात २०१८ मध्ये रेल्वेस्थानकाच्या उभारणीच्या कामाला सुरुवात झाली. नवी मुंबई ट्रान्स हार्बर मार्गावरील दीघ रेल्वेस्थानक हे ऐरोली-कळवा एलिव्हेटेड कॉरिडॉरचा एक भाग आहे. हा कॉरिडॉर ४७६ कोटी रुपये खर्चून उभारण्यात येत आहे. ठाणे-पनवेल ट्रान्स हार्बर मार्गावरील दिघा या स्थानकाच्या उभारणीसाठी २०० कोटी रुपये खर्च करण्यात आलेले आहेत. एमव्हीआरसी ही लाईन मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट -३ अंतर्गत बांधत आहे.

हे ही वाचा:

अबब!! पाकिस्तानात महागडा रमझान; ५०० रुपये डझन केळी, १६०० रु. किलो द्राक्षे

‘बाबुलनाथ’ मंदिरातील शिवलिंग उत्तम स्थितीत, तडे गेलेलेच नाहीत!

बुडत्या सिलिकॉन व्हॅली बँकेला मिळाला फर्स्ट सिटीझनचा आधार

सुषमा स्वराज यांची कन्या बांसुरीची राजकारणात उडी

ठाण्याच्या जवळ असलेल्या दिघा येथील लोकसंख्या आता लाखांवर गेली आहे. येथील लोकांना ऐरोली किंवा ठाणे येथून लोकल पकडावी लागते. त्यामुळे अगोदरच गर्दी सहन कराव्या लागत असलेल्या ठाणे स्थानकाला दिघावासियांचा भार सहन करावा लागत आहे. नवीन दिघा स्थानक सुरु झाल्यानंतर ठाणे स्थानकातील गर्दी मोठ्या प्रमाणावर कमी होण्यास मदत होणार आहे. ऐरोली किंवा ठाण्यात जाणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये बसणाऱ्यांसाठीही हा प्रकल्प फायदेशीर ठरणार आहे. ऐरोली-कळवा एलिव्हेटेड कॉरिडॉर कार्यान्वित झाल्यानंतर, प्रवाशांना ठाण्यात लोकल गाड्या बदलण्याचा द्रविडीप्राणायाम ए करता थेट ट्रान्सहार्बर लाईनवरून प्रवास करता येणार आहे. कल्याण ते नवी मुंबई प्रवास सुलभ करेल.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
191,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा