अडकलेल्या ४१ श्रमिकांपर्यंत पोहचण्यासाठी मानवी पद्धतीने खोदकामाला सुरुवात

सहा कुशल कामगारांचे (रॅट होल मायनर्स) पथक दाखल

अडकलेल्या ४१ श्रमिकांपर्यंत पोहचण्यासाठी मानवी पद्धतीने खोदकामाला सुरुवात

उत्तराखंडमधील सिलक्यारा बोगद्यात अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्यासाठी अत्यंत लहान जागेत मानवी पद्धतीने खोदगाम करणाऱ्या सहा कुशल कामगारांचे (रॅट होल मायनर्स) पथक दाखल झाले आहे. या कामगारांनी मानवी पद्धतीने खोदकाम सुरू केले आहे.

अत्यंत कमी जागेत खोदखाम करण्याचा अनुभव असणाऱ्या या खाणकामगारांना आता केवळ १० ते १२ मीटरचा ढिगारा हटवण्याचे शिवधनुष्य पेलायचे आहे. त्यानंतर हे कामगार बाहेर पडू शकतील. सोमवारी या मोहिमेचा १६वा दिवस होता. या खाणकामागारांनी अवघ्या दोन तासात एक मीटर राडारोडा बाहेर काढला होता.

प्लॅन ‘बी’नुसार भुयारात उभ्या पद्धतीने ड्रिलिंग करून कामगारांना एकेक करून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. सिलक्यारा येथे उभ्या पद्धतीने ३१ मीटरपर्यंत ड्रिलिंग पूर्ण झाले आहे. सतलज जल विद्युत निगमने सोमवार दुपारपर्यंत ८६ मीटरपैकी ३१ मीटरचे ड्रिलिंगचे काम पूर्ण केले होते.

मानवी पद्धतीने खोदकामाची प्रक्रिया अत्यंत अवघड असून, हे कामगार ढिगाऱ्यामध्ये एकापाठोपाठ एक ८०० मिमी व्यासाचे पाइप टाकणार आहेत आणि आतील राडारोडा बाहेर टाकणार आहेत. या कामगारांना ६०० मिमी व्यासाच्या पाइपांमधून राडारोडा काढण्याचा अनुभव असल्याचे सांगण्यात आले.

हे ही वाचा:

अवकाळी पावसामुळे वीज कोसळून २० जणांचा मृत्यू!

अवकाळी पावसाच्या हजेरीने मुंबईतील हवेची गुणवत्ता सुधारली

उत्तरकाशीतील बोगद्यात अडकलेल्या मजुरांच्या मदतीला कोल इंडिया

खलिस्तानी दहशतवादी अर्शदीपच्या दोन शूटर्सला ठोकल्या बेड्या

८०० मिमी व्यासाच्या पाइपच्या फ्रेम तयार करण्यात आल्या आहेत. अर्धा ते एक मीटर अशा पद्धतीने काम सुरू आहे. सर्व काही नियोजित पद्धतीने झाले आणि कोणताही अडथळा न आल्यास १० मीटरचा टप्पा २४ ते ३६ तासांत पूर्ण होऊ शकतो, असा विश्वास तंत्रज्ञांनी व्यक्त केला आहे.

Exit mobile version