मुंबई ट्रान्स हार्बर लिंक सेतूचे आज, १२ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या सेतूचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव देण्यात आलेले आहे. महाराष्ट्रातील समुद्रावरील देशातील सर्वात उंच सेतू अशी याची ओळख बनली आहे.
उद्घाटनापूर्वी मुंबई पोलिसांनीही सेतूच्या वापरासंदर्भात अनेक नियम जारी केले आहेत. चला तर मग जाणून घेऊया या सेतूच्या आणि त्याच्याशी संबंधित असलेल्या नियमांबद्दल.
अटल सेतू मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गालाही जोडला जाणार
- महाराष्ट्रातील दोन मोठ्या शहरांना जोडणाऱ्या मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गालाही हा सेतू जोडला जाणार आहे. हा सेतू सहा पदरी आहे.
- या सेतूला १८ हजार कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेला आहे. हा सेतू सुरू झाल्याने त्याला जोडलेल्या भागात आर्थिक विकास शक्य होणार आहे.
प्रवाशांना कसा फायदा होणार?
- हा सेतू समुद्रसपाटीपासून १६.५ किमी आणि जमिनीवर ५.५ किमी उंचीवर बांधण्यात आला आहे.
- या सेतूमुळे मुंबई-नवी मुंबई दरम्यानचा प्रवासाचा वेळ दोन तासांवरून केवळ २० ते २५ मिनिटांवर येणार असून इंधन आणि वेळेची बचत होणार आहे.
- प्रत्येक ट्रिपमध्ये सुमारे ५०० रुपयांची बचत होणार आहे.
सेतूवरून वाहनांना वेगेची मर्यादा किती?
- चारचाकी वाहनांची कमाल वेगमर्यादा ताशी १०० किलोमीटर इतकी असणार आहे. या वाहनांमध्ये कार, टॅक्सी, हलकी मोटार वाहने, मिनी बस आणि टू-एक्सल बस आदींचा समावेश आहे. पुलाच्या चढ-उतारावर जास्तीत जास्त वेग ताशी ४० किलोमीटर निश्चित करण्यात आला आहे.
टोल किती असेल?
- एका मार्गिकेच्या प्रवासासाठी २५० रुपये मोजावे लागणार आहेत. दोन्ही बाजूंसाठी ३७५ रुपये शुल्क भरावे लागणार आहे. हे शुल्क टाळण्यासाठी नियमित प्रवाशांना ६२५ रुपयांत डेली पास आणि १२ हजार ५०० रुपयांत मासिक पास खरेदी करता येणार आहे.
- दररोज ७० हजारांहून अधिक वाहने जातील, असा महाराष्ट्र सरकारचा अंदाज आहे. त्यामुळे टोलच्या माध्यमातून दररोज १ कोटी ७५ लाख रुपयांचे उत्पन्न अपेक्षित आहे.
हे ही वाचा:
इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांमध्ये युवा खेळाडूंना संधी
संगीत विश्वातला तारा निखळला; ज्येष्ठ शास्त्रीय गायिका प्रभा अत्रे यांचे निधन
आईबहिणीवरून शिवीगाळ करू नका! त्याविरोधात आवाज उठवा
अटल सेतू निर्माणामुळे गर्वाने छाती फुलून येते!
कोणत्या वाहनांना प्रवेश?
- मोटारसायकल, तीनचाकी, रिक्षा, ट्रॅक्टर, जनावरांना ओढणारी वाहने आणि संथ गतीने चालणारी वाहने यांना पुलावरून जाण्यास मनाई करण्यात आलेली आहे.
- ईस्टर्न फ्रीवेवर मुंबईच्या दिशेने जाणारी मल्टी एक्सल अवजड वाहने, ट्रक आणि बसेसना परवानगी देण्यात येणार नाही.
- या वाहनांना पुढील वाहतुकीसाठी मुंबई पोर्ट-शिवडी एक्झिट (एक्झिट १ सी) चा वापर करावा लागणार आहे.
सागरी प्राणी व पक्ष्यांच्या संरक्षणासाठी विशेष व्यवस्था
- विशेष म्हणजे या पुलाच्या वर आणि खाली १९० सीसीटीव्ही कॅमेरे असून त्यापैकी १३० कॅमेरे हायटेक आहेत.
- दरवर्षी हिवाळ्यात फ्लेमिंगो पक्षी येथे येतात. याची विशेष काळजी घेत पुलाच्या बाजूला साऊंड बॅरिअर्सही लावण्यात आले आहेत. यामुळे ध्वनी प्रदूषण होणार नाही आणि पक्ष्यांचे कोणतेही नुकसान होणार नाही.
- याशिवाय पुलावर असे दिवे लावण्यात आले आहेत, जे केवळ पुलावर पडतात आणि सागरी प्राण्यांना हानी पोहोचवत नाहीत.