एमएस धोनीने षटकार खेचावा, असे हार्दिक पांड्यालाच वाटत होते का?

गावस्कर यांची मुंबईच्या कर्णधाराला विचारणा

एमएस धोनीने षटकार खेचावा, असे हार्दिक पांड्यालाच वाटत होते का?

रविवारी वानखेडे स्टेडिअमवर रंगलेल्या सामन्यात मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्याच्या शेवटच्या षटकात चेन्नईच्या एमएस धोनीने तीन षटकार खेचले. धोनीने चार चेंडूंत २० धावांची नाबाद खेळी करून चेन्नईची धावसंख्या दोनशेपार नेली. या इनिंगचे वर्णन करताना महान फलंदाज सुनील गावस्कर यांनी हार्दिक पांड्याच्या सामन्यातील शेवटच्या षटकाबाबत प्रश्न उपस्थित केले.

स्टार स्पोर्ट्सशी बोलताना गावस्कर यांनी धोनीला सर्वसाधारणपणे गोलंदाजी केल्याबद्दल हार्दिकवर टीका केली. असे वाटत होते की हार्दिक मुद्दामहून त्याच्या लाडक्या ज्येष्ठ खेळाडूला वाईट गोलंदाजी करत आहे, असे ते म्हणाले. ‘मी गेल्या कित्येक दिवसांतली कदाचित सर्वांत वाईट गोलंदाजी पाहिली. स्वतःच्या हिरोला आंदण दिल्यासारखी ही गोलंदाजी दिसत होती. त्याने अशा प्रकारे गोलंदाजी केली की त्याच्यावर त्याने षटकार सहजच खेचले. एक षटकार समजू शकतो. परंतु जेव्हा तुम्हाला माहीत आहे की, समोरचा फलंदाज उंच टप्प्याच्या चेंडूच्या प्रतीक्षेत आहे आणि तेव्हा देखील तुम्ही अशीच गोलंदाजी करता, तेव्हा आश्चर्य वाटते. तिसरा चेंडूही तसाच. लेगसाइडला चेंडू केला आणि त्याने षटकार खेचला. ही अतिशय सर्वसाधारण गोलंदाजी होती आणि अतिशय अतिसामान्य कर्णधाराची खेळीसुद्धा!’ अशा शब्दांत गावस्कर यांनी हार्दिकवर टीका केली.

हे ही वाचा:

सरबजीत सिंगच्या मारेकऱ्याची हत्या करणाऱ्याचे रणदीप हुडा याने मानले आभार

सरबजीत यांचा मारेकरी मारला गेला, मात्र न्याय मिळाला नसल्याची मुलीची खंत

रामनवमीसाठी अयोध्येतील राम मंदिरात प्रसादासाठी १ लाख ११ हजार १११ किलोचे लाडू

गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ म्हणतो, मी झाडली सलमानच्या घरावर गोळी!

एमएस धोनीच्या झंझावाती २० धावांमुळे चेन्नई २०० पार धावा करू शकली. शेवटचे षटक टाकण्यासाठी आलेल्या हार्दिकला धोनीने तीन षटकार खेचले. हार्दिक पांड्या आणि एमएस धोनी यांची मैदानाबाहेरही चांगली मैत्री आहे. मुंबई आणि चेन्नईचा सामना सुरू झाल्यावर पांड्याने धावतच जाऊन धोनीला आलिंगन दिले होते. धोनी हा चेन्नईच्या सहखेळाडूंसोबत वार्म अप करत असताना हार्दिक धावतच त्याच्याकडे गेला. हार्दिकने भारतीय संघात पदार्पण धोनीच्या नेतृत्वाखालीच केले आहे. सामना सुरू होण्यापूर्वी हार्दिकने धोनीशी हस्तांदोलनही केले. हे सारे घडत असताना प्रेक्षकांनीही शिट्ट्या वाजवून आनंद व्यक्त केला.

Exit mobile version