स्वानंद किरकिरे आणि ‘ऍनिमल’ टीममध्ये जुंपली!

‘ऍनिमल’ चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई

स्वानंद किरकिरे आणि ‘ऍनिमल’ टीममध्ये जुंपली!

रणबीर कपूर याच्या ‘ऍनिमल’ या चित्रपटावर टीका करणारी गीतकार, गायक स्वानंद किरकिरे यांची पोस्ट खूप व्हायरल झाली. आता त्यांना प्रत्युत्तर देणारी पोस्ट ‘ऍनिमल’ या चित्रपटाच्या टीमने केली आहे. त्यामुळे या दोघांमध्ये चांगलीच जुंपली असल्याचे दिसून येत आहे.

‘ऍनिमल’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करत आहे. त्याला देशभरातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. असे असले तरी या चित्रपटावर अनेकांनी टीकाही केली आहे. सुप्रसिद्ध गीतकार स्वानंद किरकिरे यांनी या चित्रपटावर जोरदार टीका केली. त्यांनी गेल्या आठवड्यात चित्रपटावर केलेली टीका खूप व्हायरल झाली. मात्र ‘ऍनिमल’ चित्रपटाच्या टीमने त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. किरकिरे यांनी चित्रपटात महिलांबाबत दाखवलेल्या गैरव्यवहारावर टीका केली होती.

हे ही वाचा:

तीन राज्यांत महिलाशक्ती? मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री महिला होण्याची शक्यता

लग्नात हुंडा मागितल्याने केरळच्या २६ वर्षीय महिला डॉक्टरची आत्महत्या!

ऑस्ट्रेलियातील विद्यापीठे लवकरच भारतात कॅम्पस सुरु करणार

आदित्य ठाकरेंची एसआयटी चौकशी होणार

तसेच, भारतीय चित्रपटाचा गौरवशाली इतिहास यामुळे कलंकित झाल्याची टिप्पणीही केली होती. त्यावर ‘ऍनिमल’ चित्रपटाच्यी टीमने त्यांची ही टीका ज्या वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाली आहे, त्याचे छायाचित्र पोस्ट केले आहे. तसेच, उपहासात्मक टीका केली आहे. ‘तुम्ही तुमचे गुडघे आणि पायाच्या बोटांना पुढे पडू देऊ नका किंवा एकावर एक पडू देऊ नका. चांगले संतुलन राखण्यासाठी पायांना खांद्यापासून वेगळे ठेवा. त्यामुळे तुमचा तोल सांभाळला जाईल. त्यानंतर तुमच्या पायांच्या बोटांवर हळूवारपणे उभे राहा. हा… तुम्ही योग्य प्रकारे लँड केले आहे,’ अशी पोस्ट करून त्यात स्वानंद किरकिरे यांनाही टॅग केले आहे. हे जोरदार प्रत्युत्तर दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा याने दिल्याचे मानले जात आहे.

Exit mobile version