प्रादेशिक भाषांवरची पकड मजबूत होऊन त्यांचे शब्द सहज सापडतील आणि त्यांचा अधिकाधिक वापर करता यावा यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. यासाठी १० भारतीय प्रादेशिक भाषांमध्ये शब्दकोष प्रकाशित करण्यात येणार आहे. भारतीय शिक्षण मंत्रालयाचा वैज्ञानिक आणि तांत्रिक शब्दावली आयोग (CSTT) तांत्रिक आणि वैज्ञानिक संज्ञा विकसित करण्यासाठी काम करत आहे.
संस्कृत, बोडो, संथाली, डोगरी, काश्मिरी, कोकणी, नेपाळी, मणिपुरी, सिंधी, मैथिली या भाषांचा भारताच्या आठव्या अनुसूचीमध्ये अधिकृत भाषा म्हणून समाविष्ट असलेल्या २२ भाषांमध्ये समावेश आहे. मात्र, तांत्रिक संकल्पना आणि वैज्ञानिक संज्ञा स्पष्ट करण्यासाठी शब्दकोषाच्या अभावामुळे या भाषांमध्ये फारच कमी अभ्यास साहित्य बाजारात उपलब्ध आहे.
हे ही वाचा:
केरळमध्ये बोट उलटून २१ जणांचा मृत्यू, केंद्र सरकारकडून २ लाखांची मदत
‘द केरळ स्टोरी’ हा अंतर्बाह्य हादरवून टाकणारा अनुभव
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे घामोळ्याच्या पावडरला फुटला घाम
मोचा चक्रीवादळाचा धोका, महाराष्ट्रातही मुसळधार पावसाची शक्यता
सरकार हे वैज्ञानिक आणि तांत्रिक शब्दकोश तीन ते चार महिन्यांत प्रत्येक भाषेतील ५ हजार शब्दांसह प्रकाशित करणार आहे. तसेच हे शब्दकोश हे डिजिटल स्वरूपात मोफत उपलब्ध होणार आहेत. शिवाय प्रत्येक भाषेत या शब्दकोशाच्या एक हजार ते दोन हजार प्रती छापल्या जाणार आहेत.