पंतप्रधान नरेंद्र मोदींचा प्रभाव देशातच नाहीतर परदेशातही दिसून येत आहे. आतापर्यंत पंतप्रधान मोदींना भेट म्हणून अनेकांनी अनेक वस्तूंवर उत्कृष्ट अशी प्रतिमा कोरून सादर केल्या आहेत. पंतप्रधान परदेश दौऱ्यावर असतात तेव्हा तेथील भारतीय नागरिक त्यांना भेटण्यासाठी उत्सुक असतात. अमेरिकेतही असेच दृश्य पाहायला मिळत आहे. पंतप्रधान मोदी तीन दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. दरम्यान, अमेरिकेत राहणाऱ्या दोन भारतीयांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी एक खास भेट तयार केली आहे.
भारतीय वंशाच्या दोन ज्वेलर्सनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची हिऱ्यांपासून एक प्रतिमा तयार केली आहे. राजकुमार आणि असित श्रीमल अशी त्यांची नावे आहेत. पंतप्रधान मोदींची भेट घेवून त्यांना ही ‘हिऱ्यांची प्रतिमा’ देणार आहेत. दोघेही ४० वर्षांपासून अमेरिकेत राहत आहेत.
हे ही वाचा :
शरीर संबंधाला विरोध केल्याने ६ वर्षांच्या मुलीची हत्या
‘द लीजेंड ऑफ मौला जट’ पंजाब मध्ये प्रदर्शित होणार ?
लेबनॉनमध्ये इस्रायली हल्ल्यात ४९२ ठार, हिजबुल्लाहने प्रत्युत्तरादाखल २०० रॉकेट डागले
आरोपीला भरचौकात फाशी द्या मागणी करणाऱ्यांची आपुलकी कशी वाढली?
मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदींची ही ‘हिऱ्याची प्रतिमा’ तयार करण्यासाठी तब्बल दीड वर्षांचा कालावधी लागला आहे. ४० कामगारांनी आपली कारागिरी दाखवत उत्कृष्ट अशी प्रतिमा बनवली आहे. विशेष म्हणजे ही प्रतिमा तब्बल ३ हजार हिऱ्यांपासून तयार करण्यात आली आहे. दरम्यान, अमेरिकेतील लाँग आयलँडमध्ये पंतप्रधान मोदींचा कार्यक्रम पार पडणार आहे. या कार्यक्रमामध्ये पंतप्रधान मोदींना त्यांची ‘हिऱ्यांची प्रतिमा’ भेट म्हणून राजकुमार आणि असित देणार आहेत. पंतप्रधान मोदींची ही हिऱ्यांची प्रतिमा खास आकर्षक आणि चर्चेचा विषय ठरली आहे.