भाजपा नेते, रा.स्व.संघ नेत्यांनंतर आता धोनीचा नंबर

भाजपा नेते, रा.स्व.संघ नेत्यांनंतर आता धोनीचा नंबर

भारतीय संघाचा सर्वात यशस्वी कर्णाधार महेंद्र सिंह धोनीवरही आता असहिष्णू ट्विटरने कारवाई केली आहे. मायक्रो ब्लॉगिंग साईट ट्विटरने महेंद्र सिंह धोनीच्या ट्विटर हँडलवरील व्हेरीफिकेशन मार्क म्हणजेच ब्लू टिक काढून घेतली आहे. महेंद्र सिंह धोनीचे ट्विटर अकाऊंट सक्रीय नसल्याने ब्लू टिक काढली असल्याची माहिती मिळत आहे. यापूर्वीही ट्विटरने अशा अनेक प्रसिद्ध व्यक्तींची ब्लू टिक काढून घेतली आहे.

गेल्या काही दिवसांपासून मायक्रो ब्लॉगिंग साईट ट्विटरने आपल्या अनेक नियमांमध्ये बदल केले आहेत. यानुसार अनेक प्रसिद्ध व्यक्तींची ब्लू टिक ट्विटरने काढून घेतली होती. महेंद्र सिंह धोनीचं ट्विटर अकाऊंटही सध्या सक्रीय असल्याचे दिसत नाही. धोनीच्या अकाऊंटवर ८ जानेवारी २०२१ ला शेवटचं ट्विट पहायला मिळत आहे. या ट्विटमध्ये धोनी स्टोबेरीच्या शेतात दिसत असून तो स्टोबेरी खात असल्याचे व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.

हा व्हिडीओ इंस्टाग्रामवर पोस्ट केलेला असून त्याची लिंक ट्विटरवर शेअर केली आहे. दरम्यान, सर्वाधिक फोलोवर्स असलेल्यांमध्ये धोनीचं ट्विटर हँडल मोडते. धोनीच्या ट्विटरवर सध्या ८.२ मिलीयन फोलोवर्स असून तो फक्त ३३ लोकांना फोलो करत आहे. धोनीने खूप महिन्यांपासून कोणतही ट्विट केलं नाही. शिवाय यावर तो सक्रीय देखील दिसत नाही. त्यामुळे ब्लू टिक काढल्याचे बोलले जात आहे.

हे ही वाचा:

कुस्तीपटू बजरंग पुनियाचा पराभव, आता लढणार कांस्यपदकासाठी

‘संसदेचं अधिवेशन चालू द्या’ म्हणत ‘या’ खासदाराचं आंदोलन

हिंदुत्वाबद्दल मनसे नेते नांदगावकर म्हणाले…

आता मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार

महेंद्रसिंह धोनीच्या अकाऊंटची ब्ल्यू टिक हटवल्याबद्दल ट्विटरकडून अद्याप कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही. धोनीच्या अकाऊंटला पुन्हा ब्ल्यू टिक दिली जाणार का हे पाहावं लागणार आहे.

Exit mobile version