४१ व्या वयात धोनीने रचला विश्वविक्रम!

एडन मार्करांमचा २०८ वा झेल पकडून क्विंटन डी कॉकला मागे टाकले

४१ व्या वयात धोनीने रचला विश्वविक्रम!

आयपीएलच्या चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबादच्या सामन्यात महेंद्र सिंह धोनीने टी-२० क्रिकेटमधील मोठा विक्रम आपल्या नावावर नोंदवला आहे. वयाच्या ४१ व्या वर्षीही धोनी आपली जादू दाखवताना दिसतोय. पुरुषाच्या टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक झेल टिपणारा विकेटकीपर म्हणून विक्रम आपल्या नावावर नोंदवला आहे. धोनीने टी-२० क्रिकेटमध्ये एडन मार्करांमचा २०८ वा झेल पकडून क्विंटन डी कॉकला मागे टाकले आहे. डी कॉकने आतापर्यंत २०७ झेल टिपलेले आहेत. त्या पाठोपाठ नंबर लागतो दिनेश कार्तिक. त्याने आतापर्यंत २०५ झेल टिपत तिसऱ्या स्थान गाठलेले आहे.

धोनीने सर्वाधिक झेल घेण्याचा टी-२० विक्रमावरच तो थांबलेला नाही. आयपीएलच्या इतिहासात २०० फलंदाजांना बाद करणारा तो पहिला विकेटकीपर ठरलेला आहे. धोनीने सनरायझर्सविरुद्ध स्टंपिंग आणि रनआउट करून हा करिष्मा केलेला आहे.

हेही वाचा :

प्लास्टिकचा वापर सोडाल, तरच पुढे टिकाल!

प्लास्टिकचा वापर सोडाल, तरच पुढे टिकाल!

सेक्स रॅकेट चालविणाऱ्या भोजपुरी अभिनेत्रीचा पर्दाफाश

चिनी सैनिकांच्या कृत्यांना भारतीय जवान देणार त्यांच्याच भाषेत प्रत्युत्तर

शुक्रवारी झालेल्या या सामन्यात चेन्नईने सनरायझर्स हैदराबादचा सहज ७ विकेट्सने पराभव केला. कर्णधार महेंद्र सिंह धोनीने टॉस जिंकत गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्याचा हा निर्णय चेन्नईच्या गोलंदाजी अचूक ठरवत हैदराबादला अवघ्या १३४ धावांत रोखले. चेन्नईने हे सोपे आव्हान १९ व्या षटकात आऱामात पार केले. चेन्नईचा फिरकी जादूगर रवींद्र जडेजाने हैदराबादच्या फलंदाजांना सळो की पळो केले. त्यानंतर डेवोन कॉन्वेच्या तुफानी नाबाद ७७ धावांच्या जोरावर हैदराबादला चारी मुंड्या चीत केले. रवींद्र जडेजाला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले. या हंगामात दोन वेळा सामनावीर पुरस्कार मिळवणारा रवींद्र जडेजा हा पहिला खेळाडू आहे.

चेन्नईने सुपर किंग्जने हैदराबादवरील या विजयामुळे गुणतक्त्यात आपले तिसरे स्थान कायम राखले आहे. आतापर्यंत झालेल्या सहा सामन्यात त्यांनी चार सामन्यात विजय मिळवत आठ गुण मिळवले आहे. पहिल्या लढतीत गुजरातने चेन्नईचा धुव्वा उडवला होता. मात्र त्यानंतर लखनौ आणि मुंबईचा पराभव करत चेन्नईने जोरदार वापसी केली. चौथ्या लढतीत राजस्थानकडून मात्र चेन्नईला पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर काल हैदराबादला पराभूत करण्यात चेन्नईला यश आले.

धोनीचे हे पाच विक्रम मोडणे केवळ कठीण

Exit mobile version