22 C
Mumbai
Tuesday, December 24, 2024
घरविशेषधर्मवीर सुपरहिट झाला! किती कमावले?

धर्मवीर सुपरहिट झाला! किती कमावले?

Google News Follow

Related

मराठी चित्रपट ‘धर्मवीर’ हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर हिट ठरला. सिनेमागृहात या चित्रपटाने धुमाकूळ घातल्यानंतर हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवरदेखील रिलीज झाला. हा सिनेमा प्रदर्शित होऊन ५० दिवस पूर्ण झाले आहेत. तर ‘धर्मवीर’ सिनेमा २०२२ मधला सर्वात मोठा सुपरहिट ब्लॉकबस्टर सिनेमा ठरला आहे. सिनेमाच्या टीमने खास पोस्ट शेअर करत प्रेक्षकांचे आभार मानले आहेत.

 मराठी चित्रपटांकडे पाठ फिरवली जाते असं बोललं जातं पण ‘धर्मवीर’ने बॉक्सऑफिसवरच्या घवघवीत यशाने प्रेक्षक पुन्हा मराठी चित्रपटाकडे येऊ लागल्याचं सुखद चित्र दिसत आहे. १३ मे रोजी ‘धर्मवीर’ सिनेमा तब्बल चारशेहुन अधिक सिनेमागृहे आणि १० हजारांहून अधिक शोजसह प्रेक्षकांच्या भेटीस आला. त्यानंतर ओटीटी प्लॅटफॉर्मवरही हा चित्रपट आला. अजूनही हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतो आहे. पहिल्या दिवशी या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर २.५ कोटींची कमाई करत विक्रमी सुरुवात केली होती. तर दहा दिवसांत १८.०३ कोटींची कमाई केली आहे.

हे ही वाचा:

दहा तासांनी राऊत यांची ईडी कार्यालयातून सुटका

उद्धवजी कृपा करा, मुंबईकरांच्या मेट्रो स्वप्नाशी खेळू नका….

भाजपाकडून विधानसभा अध्यक्षपदासाठी राहुल नार्वेकरांना उमेदवारी

आणि पुन्हा नीरज चोप्राने स्वतःचाच विक्रम मोडला

प्रविण तरडे यांनी लेखन, दिग्दर्शन केलेला आणि अभिनेता प्रसाद ओक यांनी साकारलेल्या आनंद दिघे यांच्या भूमिकेवर प्रेक्षकांनी आपल्या पसंतीची ठसठशीत मोहोर उमटवली आहे. सध्या ‘धर्मवीर मु.पो. ठाणे’ हा सिनेमा सध्या चांगलाच चर्चेत आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा