मराठी अभिनेता प्रसाद ओकची मुख्य भूमिका असलेला ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला. प्रवीण तरडे दिग्दर्शित या चित्रपटात अभिनेता प्रसाद ओकने आनंद दिघे यांची भूमिका चित्रपटात साकारली होती. प्रसाद ओक यांची भूमिका लोकांच्या पसंतीस उतरली होती. त्यानंतर अभिनेता प्रसाद ओक यांनी मोठी घोषणा केली आहे.
आनंद दिघे यांची शुक्रवार, २६ ऑगस्ट रोजी २१वी पुण्यतिथी होती. या पुण्यतिथीनिमित्त प्रसाद ओकने खास पोस्ट शेअर केली आहे. आनंद दिघे यांच्या जीवनावर एक पुस्तक लिहिल्याचे प्रसाद ओकने सांगितले आहे. या फोटोत एका पुस्तकाचा फोटो शेअर केला असून या पुस्तकावर ‘माझा आनंद’ असे लिहिण्यात आले आहे. त्याखाली लेखकाचे नाव प्रसाद ओक असे लिहिलेले आहे. यासोबत त्याने आनंद दिघे यांचा एक फोटोही शेअर केला आहे.
View this post on Instagram
आनंद दिघे यांना अभिवादन त्याने केले असून लवकरच धर्मवीरच्या संपूर्ण प्रवासावर आधारित ‘माझा आनंद’ हे पुस्तक येत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. चित्रपटावर जितकं प्रेम केलं तेवढंच पुस्तकावर प्रेम कराल असा विश्वास प्रसाद ओक यांनी व्यक्त केला आहे. या पुस्तकाचे प्रकाशक मेहता पब्लिशिंग हाऊस असून अक्षर सुलेखन सचिन गुरव आणि शब्दांकन प्रज्ञा पोवळे यांनी केले आहे.
हे ही वाचा:
मुंबई फेरीवाल्यांसाठी लवकरच नवे धोरण
‘या’ दिवशी नागपूरमध्ये सुरू होणार हिवाळी अधिवेशन
प्रज्ञानंद प्रार्थना करून बुद्धिबळ खेळयला करतो सुरुवात
प्रसाद ओक यांच्या या पोस्टमुळे हे पुस्तक कधी वाचकांच्या भेटीला येणार आणि या पुस्तकात नेमकं काय असणार याकडे साऱ्यांचे लक्ष असणार आहे.