मुंबईतील धारावीमध्ये कोविड-१९ झपाट्याने वाढत असताना त्याला यशस्वीपणे आळा घालणारे एसीपी रमेश नांगरे यांचे काल (१२ मार्च) हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.आशिया खंडातील सर्वात मोठ्या झोपडपट्टीत, म्हणजेच धारावीत, लॉकडाऊनची यशस्वीरित्या अंमलबजावणी करण्यात रमेश नांगरे यांचा सिंहाचा वाटा होता. रमेश नांगरे हे ५५ वर्षांचे होते.
भारतात जून २०२० ते ऑक्टोबर २०२० हा काळ कोविड-१९ संसर्गाच्या दृष्टीने मोठा नाजूक होता. या काळात भारतात सर्वच शहरांमध्ये कोविड-१९ च्या केसेस मोठ्या प्रमाणात वाढत होत्या. त्यातही महाराष्ट्रात कोविड-१९ च्या केसेस या सर्वाधिक होत्या. महाराष्ट्रही सर्वात जास्त केसेस या साहजिकच सर्वात जास्त लोकसंख्येची घनता असलेल्या मुंबईमध्ये आढळत होत्या. कोविड-१९ चा संसर्ग हा सोशल डिस्टंसिन्गने कमी होऊ शकतो. परंतु धारावी सारख्या ठिकाणी सोशल डिस्टंसिन्ग कसे सध्या करणार? धारावीत कोविड-१९ चा संसर्ग वाढला तर त्याला आळा घालणे अशक्य होईल आणि अनेक निरपराध लोकांना प्राण गमवावे लागतील ही भिती सर्वांनाच होती. अशावेळी देशभरात जो लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता, तो यशस्वीपणे राबवणात एसीपी रमेश नांगरेंचे मोठे योगदान होते.
हे ही वाचा:
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाला सुरूवात
भारताच्या पूर्व सीमांचे रक्षण राफेलकडे
महाराष्ट्रात लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर? एका दिवसात वाढले चौदा हजारपेक्षा जास्त रुग्ण
कोविड-१९ काळात रमेश नांगरेंच्या पोलीस स्टेशनमध्ये काम करणाऱ्या ६० लोकांना कोविड-१९ ची बाधा होऊन देखील रमेश नांगरेंनी एकट्याने पोलीस स्टेशन आणि त्यांच्या अखत्यारीतील कोविड-१९ टीम यशस्वीपणे हाताळली होती.