धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या विरोधात उद्या ठाकरे गटाचा मोर्चा निघणार आहे.त्यासाठी ठाकरे गटाकडून तयारी देखील करण्यात आली आहे.स्वतः उद्धव ठाकरे या मोर्चेत सहभागी असणार आहेत.ठाकरे गटाकडून धारावीत ठिकठिकाणी पोस्टर्स, बॅनर्स आणि होर्डिंग्ज लावण्यात आले आहेत.अदानी विरुद्ध विराट मोर्चा, धारावीकरांच्या न्यायासाठी मुंबईकरांच्या रक्षणासाठी, अशा प्रकारच्या मजकुराचे बॅनर ठाकरेगटाकडून ठिकठिकाणी लावण्यात आले आहे.
उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे या मोर्चाचे नेतृत्व करणार आहेत.अदानी समूहाविरोधात उद्या शनिवारी ठाकरे गटाचा मोर्चा निघणार आहे.ठाकरे गटाचे माजी आमदार बाबूराव माने यांनी या मोर्चाची माहिती दिली आहे. टी जंक्शन ते अदानी समूहालाच्या कार्यालयापर्यंत आमचा भव्य मोर्चा उद्या निघणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.ठाकरे गटाने दोन दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांकडून मोर्चेचे परवानगी मागितली होती परंतु वाहतूक समस्येचे कारण देऊन धारावी पोलिसांनी या मोर्चेची परवानगी नाकारली होती.पोलीस आयुक्तांकडून परवानगी घ्या असे सांगण्यात आले होते.या मोर्च्याला मुंबई पोलीस आयुक्त देणार का हे पहावे लागणार आहे.
हे ही वाचा:
लसूण चोरीच्या संशयावरून एकाची हत्या, बोरिवलीत खळबळ
एसआरए सदनिका पाच वर्षांनी विकण्याचा मार्ग मोकळा होणार?
महिला न्यायाधीशाची मुख्य न्यायाधीश चंद्रचूडांकडे इच्छामरणाची मागणी!
धोनीच्या ७ क्रमांकाच्या जर्सीने ‘पाठ’ सोडली!
ठाकरे गटाचे माजी आमदार बाबूरावम्हणाले की म्हणाले की, पोलिसांनी परवानगी दिली नाहीतरी आम्ही या मोर्चावर ठाम आहोत, असं बाबूराव माने यांनी सांगितलं.या मोर्चात एक ते दीड लाख लोक सहभागी होतील, असंही ते म्हणाले.