फरारी ड्रग्ज माफिया ललित पाटील याला ससूनमध्ये दाखल करण्यासाठी राज्याचे मंत्री दादा भुसे यांचा फोन गेला होता, त्यांचे कॉल रेकॉर्ड चेक करा असा थेट आरोप ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केला. त्या आधी पुण्यातील आमदार रविंद्र धंगेकरांनीही ललित पाटीलच्या पळण्यामागे राज्यातील मंत्र्याचा हात असल्याचा आरोप केला होता.आरोप सिद्ध न झाल्यास अंधारेंवर मानहानीचा गुन्हा दाखल करण्यात येईल, मंत्री दादा भुसे यांचा इशारा
ठाकरे गटाच्या महिला नेत्या यांनी ड्रग्ज माफिया ललित पाटील याला ससून रुग्णालयात दाखल करण्यासाठी मंत्री दादा भुसे यांनी फोन केल्याचा आरोप केला होता.तसेच भुसे यांचे कॉल रेकॉर्ड चेक करा असा आरोप देखील सुषमा अंधारे यांनी केला आहे.दरम्यान, पुण्यातील कसबा मतदारसंघाचे काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांनी आज पत्रकार परिषद घेऊन मोठा आरोप केला होता.
हे ही वाचा:
लेक लाडकी; महाराष्ट्रातल्या ‘नवदुर्गां’ना नवरात्रौत्सवाची भेट
ज्येष्ठ नागरिकांना आधार देण्याचा संकल्प करूया
शासन पद्धतीविषयक अभ्यासक्रम उपयुक्त ठरेल
महायुती सरकारचा समित्या वाटपाचा फॉर्म्युला ठरला
ड्रग्स माफिया ललित पाटील पळून जाण्यात शिंदे गटातील एका मंत्र्याचा हात असल्याचा आरोप धंगेकरांनी केला होता. मात्र यावेळी त्यांनी कोणत्याही मंत्र्याचं नाव घेतलं नव्हतं. पण ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी आता मंत्री दादा भुसे यांचं नाव घेतल्याने याप्रकरणाला नवं वळण मिळालं आहे.
दरम्यान या प्रकरणी मंत्री दादा भुसे यांनी भाष्य केले आहे ते म्हणाले, या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करण्यात यावी.हा विषय अतिशय गंभीर आहे.माझ्या कॉल रेकॉर्डसची देखील चौकशी करावी.या विषयाचं राजकारण करू नये. अंधारेंनी माझ्यावर आरोप करण्याआधी माहिती घ्यायला हवी होती.तसेच आरोप सिद्ध न झाल्यास सुषमा अंधारेंनी दिलगिरी व्यक्त करावी अन्यथा त्यांच्यावर मानहानीचा गुन्हा दाखल केला जाईल, असा इशारा देखील मंत्री दादा भुसे यांनी ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंना दिला आहे.