राष्ट्रवादी काँग्रेस नेते धनंजय मुंडे यांना माझगाव सत्र न्यायालयाकडून दणका मिळाला आहे. करुणा शर्मा यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेली याचिका न्यायालयाने फेटाळून लावली आहे. शनिवार, ५ एप्रिल रोजी न्यायालयाने निकाल देत कौटुंबिक न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला आहे. यामुळे धनंजय मुंडे यांना धक्का बसला आहे.
वांद्रेच्या कुटुंब न्यायालयाने करुणा शर्मा यांच्या बाजूने निकाल देत धनंजय मुंडे यांनी करुणा शर्मा यांना दर महिन्याला दोन लाख रुपयाची पोटगी द्यावी, असा निकाल दिला होता. या निर्णयाला धनंजय मुंडे यांच्याकडून माझगाव न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. याचं याचिकेवर सुनावणी पार पडली असून कौटुंबिक न्यायालयाचा निकाल माझगाव न्यायालयाने काय ठेवला आहे. न्यायालयाने दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून घेतला. या युक्तिवादावेळी करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडे यांचे अंतिम इच्छापत्र तसेच स्वीकृती पत्र सादर केले.
माझगाव सत्र न्यायालयात शनिवारी पार पडलेल्या सुनावणीवेळी करुणा शर्मा यांनी महत्त्वाचे दस्तावेज सादर केले. यामध्ये पासपोर्ट, रेशन कार्ड, स्वीकृती पत्र आणि अंतिम इच्छापत्र यांचा समावेश होता. या कागदपत्रांमध्ये करुणा मुंडे यांचा पहिली पत्नी असा उल्लेख धनंजय मुंडे यांनी केल्याचं म्हटलं आहे. स्वीकृती पत्रात माझ्या घराच्या दबावापोटी मी लग्न करत आहे. पण करुणा मुंडे यांचा सांभाळ करणार असल्याचे धनंजय मुंडे यांनी म्हटले होते. या कागदपत्रांचे निरीक्षण करुन आणि दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून माझगाव सत्र न्यायालयाने करुणा शर्मा यांच्या बाजूने निकाल दिला.
हे ही वाचा..
“नक्षलवाद्यांनी शस्त्रे टाकून मुख्य प्रवाहात सामील व्हा!”
मोदींनी चर्चेत उल्लेख करताच कोलंबो ११ मच्छिमारांची सुटका करणार
त्यात बुचकळ्यात टाकणारे आहे तरी काय?
“भारताच्या ‘शेजारी प्रथम’ धोरणात श्रीलंकेचे विशेष स्थान”
माझगाव न्यायालयाने पोटगी देण्याचा निर्णय कायम ठेवला आहे. त्यामुळे दोन लाख रुपये पोटगी करुणा शर्मा यांना मिळणार आहे. दरम्यान, करुणा शर्मा पोटगी वाढवून घेण्याची मागणी करण्याची शक्यता असून धनंजय मुंडे या निर्णयाच्या विरोधात उच्च न्यायालयात जाऊ शकतात, अशीही शक्यता वर्तवण्यात येत आहे.