विमानप्रवाशांच्या नाठाळपणावर डीजीसीएचा चाप

विमानप्रवाशांच्या नाठाळपणावर डीजीसीएचा चाप

कोविड-१९ पासून बचावासाठीचे उपाय नीट न पाळणाऱ्या प्रवाशांवर डीजीसीएने कारवाईचा बडगा उगारला आहे. वारंवार सूचना देऊनही विमानात मास्क न वापरणाऱ्या प्रवाशांवर कडक कारवाई करण्याचा इशारा डीजीसीएकडून देण्यात आला आहे

या बाबात डीजीसीएने एक पत्रक जारी केले आहे. या पत्रकात प्रवाशांवर कोविड-१९ विरुद्धच्या सर्व निर्देशांचे पालन करण्याची सक्ती करण्यात आली आहे. विमानतळावर येताना- जाताना अथवा वावरताना मास्क वापरणे, सोशल डिस्टसिंग पाळणे बंधनकारक करण्यात आले आहे. वारंवार सूचना देऊनही हे न करणाऱ्या प्रवाशांना कारवाईला सामोरे जायला लागू शकेल.

त्याबरोबरच विमानात असताना, उड्डाणापूर्वी जर एखाद्याने वारंवार सूचना देऊनही मास्क नीट घातला नाही, तर अशा प्रवाशाला विमानातून खाली उतरवण्यात येईल. विमानोड्डाणानंतर जर एखाद्याने मास्क नीट लावला नाही, तर त्याला काळ्या यादीत टाकून त्याच्यावर कडक कारवाई केली जाऊ शकते.

हे ही वाचा:

सचिन वाझेंना अडकवणारे अधिकारी कोण?

इस्रोकडून अति-उंचीवरील वातावरणाच्या अभ्यासासाठी साऊंडिंग रॉकेटचे प्रक्षेपण

बंगाल निवडणुकीच्या तोंडावर ‘या’ बंगाली नेत्याला काँग्रेसने हटवले

विमानतळावर असताना देखील प्रवाशांनी कोविड-१९ निर्बंधांचे कडक पालन करणे आवश्यक राहणार आहे. वारंवार सूचना देऊनही तसे न केल्यास त्या प्रवाशांवर विमानतळाच्या सुरक्षारक्षकांकडून कायदेशीर कारवाई देखील केली जाऊ शकते. डीजीसीएने दिलेल्या माहितीनुसार सीआयएसएफ किंवा इतर पोलिस विमानतळावर तैनात केले आहेत. ते मास्क नसलेल्या प्रवाशांना विमानतळावर येऊ देणार नाहीत.

या महिन्याच्या प्रारंभीच दिल्ली उच्च न्यायालयाने कोलकाता-दिल्ली विमानातील प्रवाशांनी मास्क उतरवल्याचे पाहिले. त्यानंतर विमानातील ‘केबिन क्रू’ला अशा नाठाळ प्रवाशांवर कारवाई करण्याचा अधिकार देणारी नियमावली जारी केली. यानुसार कोविड निर्बंध पाळणाऱ्या प्रवाशांच्या उड्डाणावर कायमस्वरूपी प्रतिबंध घातला जाऊ शकतो.

 

Exit mobile version