27 C
Mumbai
Saturday, December 28, 2024
घरविशेषश्रद्धाच्या शरीराचे तुकडे करण्यापूर्वी 'त्याने' पाहिली Dexter वेब सीरिज

श्रद्धाच्या शरीराचे तुकडे करण्यापूर्वी ‘त्याने’ पाहिली Dexter वेब सीरिज

डेक्सटर वेब सीरिजप्रमाणे मॉर्गनने श्रद्धाचे तुकडे करून त्याची विल्हेवाट लावली

Google News Follow

Related

श्रद्धा वालकरच्या हत्येनंतर संपूर्ण देश हादरला आहे. आफताब श्रद्धाला एवढ्या क्रुरतेने कसा काय मारू शकतो, याचा लोकांना धक्का बसला आहे. आफताबमध्ये एवढी क्रूरता आली कुठून? श्रद्धाची हत्या केल्यानंतर तिचा मृतदेह आफताबने बाथरूममध्ये ठेवला. आफताबला हॉलिवूड वेब सीरिज पाहण्याचा शौक होता. आफताबने अमेरिकन क्राइम वेब सीरिज डेक्सटर पाहिल्यानंतर त्याने श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे करून विल्हेवाट लावली.

श्रद्धाच्या हत्येनंतर या वेब सीरिजची चर्चा रंगताना दिसत आहे. या वेब सीरिजमुळे लोकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. डेक्सटर ही वेब सीरिज सर्वप्रथम केबल चॅनेलवर दाखविण्यात आली. आता ही सीरिज ऍमेझॉन प्राइम या ओटीटीवरही उपलब्ध आहे. आतापर्यंत या वेब सीरिजचे १ ऑक्टोबर २००६ ते २२ सप्टेंबर २०१३ या कालावधीत आठ सीझन प्रसारित झालेत. ज्याचे एकूण ९६ एपिसोड प्रसारित झालेत.

हे ही वाचा:

चला… महागाईने दिला दिलासा

श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे घरात असतानाच विकृत आफताबने आणली नवी मैत्रीण

समाजवादीचे नेते अबू आझमी आयकर विभागाच्या रडारवर

ठाकरे गटाला धक्का! निवडणूक आयोगाविरोधातील याचिका फेटाळली

 

डेक्सटर ही एक अमेरिकन क्राइम सीरिज आहे. या सीरिजची कथा डेक्सटर मॉर्गन या मुलाच्या आयुष्याभोवती फिरते. मालिकेतील हे पात्र मायकेल सी. ह़ॉलने साकारले आहे. लहानपणी आपल्या आईची हत्या पाहणाऱ्या डेक्सरला हॅरी मॉर्गन पोलिस अधिकारी दत्तक घेतात. आईच्या हत्येचा खूप घातक परिणाम त्याच्या मनावर आणि मेंदूवर परिणाम होतो. याचाच फायदा हॅरी उठवतो. हॅरी कायद्याच्या कचाट्यातून सुटलेल्या आरोपींची हत्या डेक्सटरकडून करवून घेतो. त्यानंतर आपल्यावर कुणालाही संशय होऊ नये हेतूने डेक्स्टर मियामीतील एका पोलिस स्थानकात फॉरेन्सिक स्पेशालिस्टची नोकरी करू लागतो.

डेक्सटर आरोपींची हत्या करताना कोणताही पुरावा सापडणार नाही, याची काळजी घेतो. हातात ग्लोज घालून हत्या करतो. तसेच ज्या ठिकाणी आरोपींची हत्या करणार आहे, त्या संपूर्ण खोलीमध्ये प्लास्टिक लावून अत्यंत हुशारीने डेक्सटर त्याचा खून करतो. त्यानंतर मृतदेहाचे तुकडे करुन अटलांटिक महासागरात फेकून त्याची विल्हेवाट लावतो.

डेक्सटर वेब सीरिजमध्ये मॉर्गनने केलेल्या खुनाप्रमाणे आफताबने श्रद्धाचे तुकडे करून त्याची विल्हेवाट लावली. फरक एवढाच आहे की श्रद्धाचे तुकडे आफताब हा जंगलात फेकून देत असे आणि या सीरिजमध्ये मॉर्गन ते तुकडे महासागरात टाकत असे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा