तिरुपती लाडूत तंबाखू असल्याचा भक्ताचा दावा मंदिर समितीने फेटाळला!

खेदजनक असल्याचे मंदिर समितीचे म्हणणे

तिरुपती लाडूत तंबाखू असल्याचा भक्ताचा दावा मंदिर समितीने फेटाळला!

तिरुपती येथील प्रसिद्ध श्री व्यंकटेश्वर मंदिराकडून देण्यात येत असलेल्या लाडू प्रसादात प्राण्यांच्या चरबीचा वापर होत असल्याच्या बातम्या नुकत्याच समोर आल्या होत्या. या प्रकरणाची सध्या तपासणी सुरु आहे. मात्र, अशातच आणखी एक घटना समोर आली आहे, ज्यामध्ये एका भक्त महिलेने दावा केला की मंदिराकडून देण्यात आलेल्या लाडू प्रसादात तंबाखू सापडला आहे. कागदात गुंडाळलेल्या स्वरूपात हा तंबाखू लाडू प्रसादात होता, अशी माहिती भक्त महिलेने दिली. परंतु, तिरुमाला तिरुपती देवस्थानमने (TTD) महिलेचे आरोप फेटाळून लावले आणि तिरुपती लाडूमध्ये तंबाखू आहे असे सुचवणे खेदजनक असल्याचे म्हटले आहे.

खम्मम जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या डोन्थू पद्मावती यांनी सांगितले की, १९ सप्टेंबर रोजी तिरुपती मंदिरात दर्शन घेतल्यानंतर, मंदिराकडून मिळालेला लाडू प्रसाद कुटुंबीय-शेजाऱ्यांना वाटण्यासाठी घरी आणला. त्या पुढे म्हणाल्या, लाडूचे वाटप करत असताना त्यामध्ये छोटे-छोटे कागदाचे तुकडे होते, ज्यामध्ये तंबाखू होता. हे सर्व पाहून मला धक्काच बसला, असे महिलेने सांगितले.

हे ही वाचा : 

दुकानं, हॉटेल्सवर मालकाचे नाव हवेचं; सीसीटीव्हीही बंधनकारक

कट्टरवादी संघटना ‘हिजबूत- तहरीर’संबंधी एनआयएकडून तामिळनाडूमध्ये छापेमारी

अमेरिकेतील भारतीय वंशांच्या ज्वेलर्सनी बनविली पंतप्रधानांची ‘हिऱ्यांची प्रतिमा’

शरीर संबंधाला विरोध केल्याने ६ वर्षांच्या मुलीची हत्या

महिलेच्या दाव्यावर मंदिर समितीने उत्तर देत सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. तिरुमाला तिरुपती देवस्थानमने (टीटीडी) तिरुपती लाडूमध्ये तंबाखू असल्याचा दावा नाकारला आहे. प्रसादाचे संपूर्ण लाडू पूर्णपणे भक्तिभावाने,कठोर प्रक्रियेचे पालन करून आणि सीसीटीव्ही देखरेखीखाली तयार केले जातात, असे टीटीडीने सांगितले. हे दिशाभूल करणारे आणि खेदजनक आहे, असे टीटीडीने म्हटले आहे.

 

Exit mobile version