27 C
Mumbai
Friday, January 10, 2025
घरविशेषन्या. देवेंद्र कुमार उपाध्याय यांनी घेतली मुख्य न्यायमूर्ती पदाची शपथ

न्या. देवेंद्र कुमार उपाध्याय यांनी घेतली मुख्य न्यायमूर्ती पदाची शपथ

राज्यपाल रमेश बैस यांनी न्या. उपाध्याय यांना पदाची शपथ दिली.

Google News Follow

Related

अलाहाबाद उच्च न्यायालयातील न्यायाधीश न्या. देवेंद्र कुमार उपाध्याय यांनी शनिवार, २९ जुलै रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती पदाची शपथ घेतली. राजभवन येथे एका छोटेखानी शपथविधी समारंभामध्ये राज्यपाल रमेश बैस यांनी न्या. उपाध्याय यांना पदाची शपथ दिली.

शपथविधी सोहळ्याला राज्यपालांच्या पत्नी रामबाई बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, न्या. उपाध्याय यांचे कुटुंबिय, लोकायुक्त विद्यासागर कानडे, राज्य मानवाधिकार आयुक्त न्या. के के तातेड, राज्य निवडणूक आयुक्त युपीएस मदान, मुंबई व अलाहाबाद उच्च न्यायालयातील न्यायाधीश तसेच अलाहाबाद उच्च न्यायालयातील न्यायाधीश आणि वकील उपस्थित होते.

सुरुवातीला राज्याचे मुख्य सचिव मनोज सौनिक यांनी न्या. उपाध्याय यांच्या नियुक्तीबाबत राष्ट्रपतींची अधिसूचना वाचून दाखवली. राष्ट्रगीत आणि राज्यगीताने शपथविधी सोहळ्याची सुरुवात झाली तर राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

हे ही वाचा:

पुण्यात पकडलेल्या दहशतवाद्याच्या साथीदारास रत्नागिरीतून अटक

राज्यात प्रथमच महसूल सप्ताहाचे आयोजन

भारतीय शास्त्रज्ञांकडून हिमालयातील प्राचीन महासागराचा शोध

राज्यात सॅटेलाईट कॅम्पसमुळे स्थानिक पातळीवर रोजगार मिळतील

न्या. देवेंद्र कुमार उपाध्याय यांचा जन्म दिनांक १६ जून १९६५ रोजी झाला. न्या. उपाध्याय यांनी १९९१ मध्ये लखनौ विद्यापीठातून कायद्याची पदवी घेतली आणि ११ मे १९९१ रोजी वकील म्हणून नोंदणी केली. त्यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठात नागरी आणि घटनात्मक बाजूने कामकाज पहिले. दिनांक २१ नोव्हेंबर २०११ रोजी त्यांना अतिरिक्त न्यायाधीश पदावर बढती मिळाली आणि ६ ऑगस्ट २०१३ रोजी त्यांची न्यायाधीश पदावर नियुक्ती करण्यात आली.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
221,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा