24 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरविशेषएका लग्नाची पुढची गोष्टचा १२,५०० वा प्रयोग, राज-फडणवीस उपस्थित राहणार

एका लग्नाची पुढची गोष्टचा १२,५०० वा प्रयोग, राज-फडणवीस उपस्थित राहणार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेही या प्रयोगाला उपस्थित असणार असण्याची शक्यता जातं आहे.

Google News Follow

Related

अभिनेता प्रशांत दामले यांच्या एका नाटकाचा १२ हजार ५०० वा प्रयोग आज होणार आहे. या नाटकाच्या प्रयोगाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित राहणार आहेत. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेही या प्रयोगाला उपस्थित असणार असण्याची शक्यता जातं आहे.

आज, ६ नोव्हेंबर रोजी मुंबईत षण्मुखानंद सभागृहात प्रशांत दामलेंच्या ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ या नाटकाच्या १२ हजार ५०० वा विक्रमी प्रयोग होणार आहे. त्यांच्या या विक्रमी प्रयोगाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित राहणार आहेत. यापूर्वी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि राज ठाकरे हे शिवाजी पार्कवरील दीपोत्सवाला एकाच मंचावर आले होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत राज ठाकरे यांच्या भेटी वाढत असल्याचं म्हटलं जातं आहे. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. मात्र, नाटकाच्या प्रयोगाशिवाय कोणतंही राजकीय कारणासाठी भेट नसल्याचंही म्हटलं जातं आहे. यापूर्वी एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे हे एकमेकांच्या घरी गणपतीच्या दर्शनासाठी, एका उद्योजकाच्या समाजोपयोगी प्रकल्पासाठी एकत्र येत आले होते. तसेच महेश मांजरेकरांच्या वेडात मराठे वीर दौडले सात या चित्रपटाच्या मुहूर्त सोहळ्यालाही दोघे एकाच मंचावर पाहायला मिळाले होते.

हे ही वाचा:

दिवंगत पत्रकार पांडुरंग रायकर यांना राष्ट्रवादीकडून ती मदत अद्याप नाही, पत्नीने केली विनंती

उत्तराखंड भूकंपाने हादरले

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा जाणार गुवाहटीला

लवकरच भारतात होणार ‘ट्विटर ब्लू टिक’ लाँच, मस्क यांची पुष्टी

दरम्यान, आजच्या प्रशांत दामले यांच्या नाटकाच्या प्रयोगाला फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यासोबत एकनाथ शिंदे येणार अशी शक्यता वर्तवली जातं आहे. प्रशांत दामले यांच्या एका लग्नाची पुढची गोष्ट या नाटकाचा आजचा प्रयोग हा प्रशांत दामले यांनी त्यांच्या आजवरच्या अभिनय कारकिर्दीत १२ हजार ५०० प्रयोग ठरणार आहे. या विक्रमी प्रयोगाआधीही प्रशांत दामले यांनी केलेल्या रेकॉर्ड्सची नोंद लिम्का बुकमध्ये करण्यात आली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा