राज्यात ७५ हजार पदांसाठी नोकर भरती करणार

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

राज्यात ७५ हजार पदांसाठी नोकर भरती करणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चांगले पाऊल उचलले आहे. केंद्र सरकारने १० लाख तरुणांना नोकऱ्या देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यापैकी ७५ हजार तरुणांना आज रोजगार देण्यात आला आहे. महाराष्ट्र्र सरकारही ७५ हजार पदांसाठी नोकरभरती करण्यात येणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रोजगार मेळाव्याचा शुभारंभ केला. त्यावर प्रतिक्रिया देताना फडणवीस यांनी नागपूरमध्ये पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली आहे .

राज्यात ७५ हजार पदांसाठी नोकरभरती करण्याबरोबरच १८ हजार पोलिसांची भरती देखील करण्यात येणार आहे. त्याची जाहिरात येत्या आठवड्याभरात कढणार असल्याची माहिती देखील गृहमंत्री फडणवीस यांनी दिली. नोकर भरतीमध्ये तरुणाईला मोठ्या प्रमाणावर प्राधान्य देण्यात येईल असेही फडणवीस म्हणाले.

केंद्र सरकार देत असलेल्या सरकारी नोकऱ्या आहेत. पण खासगी क्षेत्रातही रोजगार निर्मिती होत असून त्याची आकडेवारी समोर येत आहे. राज्यात रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी देखील उपलब्ध करून देण्यात येणार आहे असे आश्वसनही फडणवीस यांनी यावेळी दिली.

हे ही वाचा:

बिपिन फुटबॉल अकादमीच्या शिबिरात मुले रंगली

काठमांडूनंतर आता गुजरात भूकंपाने हादरला

पाकिस्तानचे ऐकण्याची गरज नाही, क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी पाकला सुनावले

ब्रिटनच्या पंतप्रधान लिझ ट्रस यांनी दिला राजीनामा

पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांनी आज १० लाख कर्मचार्‍यांसाठी ‘रोजगार मेळा’ भरती मोहीम सुरू केली. पंतप्रधान मोदींनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे रोजगार मेळाव्याचा शुभारंभ केला. यावेळी  ७५ हजार जणांना नियुक्तीपत्रे देण्यात आली.संरक्षण मंत्रालय, रेल्वे मंत्रालय, श्रम आणि रोजगार मंत्रालय, पोस्ट विभाग, गृह मंत्रालय, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल, केंद्रीय अन्वेषण ब्यूरो, सीमाशुल्क, बँकिंग आदी विविध क्षेत्रातील नोकऱ्यांसाठी आज नियुक्ती पत्रे देण्यात आली आहेत.

 

Exit mobile version