नागपूरमध्ये लागू करण्यात आलेला लॉकडाऊन वाढणार की नाही याबाबत आज महत्त्वाचा निर्णय होणार आहे. नागपूरमधील कोरोना आणि लॉकडाऊनबाबत आज पालकमंत्री नितीन राऊत यांच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक होत आहे. या बैठकील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे सुद्धा उपस्थित आहेत. “लॉकडाऊन हा पर्याय नाही, मात्र सात दिवस लॉकडाऊन केले आहे, प्रशासनाला वाटत असेल लॉकडाऊन लावले पाहिजे तर आम्ही टोकाची भूमिका घेणार नाही”, असं देवेंद्र फडणवीस यांनी बैठकी आधी सांगतिलं.
देवेंद्र फडणवीस यांनी बैठकीला हजेरी लावण्यापूर्वी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. ते म्हणाले, “नागपुरात मोठ्या प्रकरणात कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे. गेल्या दोन तीन दिवसात मृत्यू संख्यादेखील वाढत आहे. या अनुषंगाने नागपुरात आज पालकमंत्र्यांनी बैठक बोलावली आहे. आम्ही या बैठकीला उपस्थित आहोत, तात्काळ काय उपाययोजना करता येईल या अनुषंगाने या बैठकित चर्चा केली जाणार आहे”
हे ही वाचा:
मनसुख हिरेन यांच्या मृतदेहाच्या जागी अजून एक मृतदेह
अमेरिकेचे संरक्षणमंत्री भारतात
प्रे: इमिग्रेशन, इस्लाम ॲंड दी इरोजन ऑफ विमेन्स राईट्स
मनसुख हिरेन प्रकरणाचा तपासही आता एनआयएकडे
देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला काही सूचना केल्या आहेत.
कोरोना रुग्णालये आणि बेड वाढवा, स्वतंत्र कोव्हिड रुग्णालये राखीव ठेवा.
कोव्हिड वॉर्ड बंद झाले आहेत, ते पुन्हा सुरु करा.
बिलांवर देखरेखीसाठी ऑडिटर सुरु करा.
हळू काम सुरु आहे, त्याचा वेग वाढवा.
होमक्वारंटाईन लोक रस्त्यावर फिरतायत, त्यांना सरळ उचलून क्वारंटाईन सेंटरमध्ये न्या, त्यांच्यावर कारवाई करा
आयुक्तांनी फेस रेकग्नेशनबाबतची माहिती दिली, बाहेर फिरणाऱ्या लोकांना कॅमेरे ओळखतील
कार्यालये बुकिंग आहेत, ते रद्द केल्यामुळे पैसे मिळत नाहीत, त्याची एसओपी ठरवा
आम्ही सोबत आहोत, जे निर्णय घेतील त्याची अंमलबजावणी करा
पूर्ण लॉकडाऊनऐवजी, निर्बंध लागू करण्याचा मुद्दा समोर आला, तो योग्य आहे.