रक्तदान शिबिराने सुरू झाला सेवासप्ताह

देवेंद्र फडणवीसांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आमदार अतुल भातखळकरांचा उपक्रम

रक्तदान शिबिराने सुरू झाला सेवासप्ताह

भाजपा नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सेवा सप्ताहाला कांदिवली पूर्व विधानसभेत उत्साहात सुरुवात झाली. आमदार अतुल भातखळकर यांच्या मार्गदर्शनाखाली हनुमाननगर येथील अटलबिहारी वाजपेयी सभागृहात रक्तदान शिबीर आयोजित करून सेवा सप्ताहाचा शुभारंभ करण्यात आला. प्रारंभी आमदार भातखळकर यांच्या हस्ते लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीपप्रज्वलन करण्यात आले.

यावेळी बोलताना आमदार भातखळकर म्हणाले की, सेवा आणि संघटन हे भारतीय जनता पक्षाचे वैशिष्ट्य आहे. सेवेच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचणे, त्यांचे प्रश्न समजावून घेऊन ते सोडवणे अशी विविध कामे आपण भाजपाच्या माध्यमातून करत असतो. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने आयोजित सेवा सप्ताहात हे शिबीर पार पडत आहे. त्यातच देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रतिष्ठेचा लोकमान्य टिळक पुरस्कार जाहीर झाला आहे. उद्या लोकमान्य टिळक यांची जयंतीही आहे आणि हा कार्यक्रम अटलबिहारी वाजपेयी सभागृहात पार पडत आहे, हा दुग्धशर्करा योग आहे.

हे ही वाचा:

‘आदेश नसतानाही यासिन मलिकला न्यायालयात का आणले?’

दिल्लीतील दोन मशिदींना इशारा; अनधिकृत बांधकाम हटवा, नाहीतर कारवाई

रेल्वेमंत्री वैष्णव यांनी सांगितले बालासोर अपघाताचे कारण

विराट कोहलीची सर डॉन ब्रॅडमन यांच्याशी बरोबरी

यावेळी आमदार भातखळकर यांच्या हस्ते रक्तदान केलेल्या रक्तदात्यांचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. शिबिरात सहभागी झालेल्या सर्व रक्तदाते आणि आयोजकांचेही आमदार भातखळकर यांनी अभिनंदन केले.

Exit mobile version